IPL 2024 Latest Points Table After  Yesterday's Sunrisers Hyderabad Match
IPL 2024 Latest Points Table After Yesterday's Sunrisers Hyderabad Match twitter
क्रीडा | IPL

IPL 2024 Points Table: हैदराबादच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा फेरबदल! तुमचा आवडता संघ कितव्या स्थानी?

Ankush Dhavre

IPL 2024 Latest Points Table:

सनरायझर्स हैदराबाद संघाकडून मुंबई इंडियन्स संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा सामना मुंबई इंडियन्सने ३१ धावांनी गमावला आहे. या मुंबई इंडियन्सचा या हंगामातील सलग दुसरा पराभव ठरला आहे. तर गेल्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर पराभूत होणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाने या सामन्यात शानदार कमबॅक केलं आणि या हंगामातील पहिला विजय मिळवला. दरम्यान या सामन्यानंतर गुणतालिकेत कोणता संघ कितव्या स्थानी आहे, जाणून घ्या.

मुंबईला पराभूत करत सनरायझर्स हैदराबाद संघ तिसऱ्या स्थानी आहे. या संघाने २ पैकी १ सामना जिंकला आहे. तर ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाने २ पैकी २ सामने जिंकले आहेत. हा संघ अव्वल स्थानी कायम आहे.

हैदराबादच्या विजयानंतर गुणतालिकेत बदल?

आयपीएलच्या गुणतालिकेत राजस्थान रॉयल्सचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. तर सनरायझर्स हैदराबादचा संघ तिसऱ्या स्थानी आहे. या यादीत कोलकाता नाईट रायडर्स संघ चौथ्या, पंजाब किंग्जचा संघ पाचव्या, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ सहाव्या आणि गुजरात टायटन्सचा संघ सातव्या स्थानी आहे. या सर्व संघांचे गुण समान आहेत. चेन्नई सुपर किंग्ज हा एकमेव संघ आहे ज्या संघाने दोन्ही सामने जिंकले आहेत. तर दिल्ली कॅपिटल्स, लखनऊ सुपर जायंट्स, मुंबई इंडियन्स हे संघ अजूनही आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहेत.

मुंबईचा पराभव..

सनरायझर्स हैदराबाद (sunrisers hydrabad) विरुद्ध मुंबई इंडियन्स या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला ३१ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सनरायझर्स हैदराबादकडून प्रथम फलंदाजी करताना हेनरिक क्लासेनने ८० धावांची खेळी केली. तर अभिषेक शर्माने ६३ धावा केल्या. हैदराबादने २० षटकात ३ गडी बाद २७७ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला ५ गडी बाद २४६ धावा करता आल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The Great Indian Kapil Show बंद पडणार आहे का? अर्चना पूरण सिंहने व्हिडिओ शेअर करत सांगितलं सत्य

TVS Iqube EV ची वाढली मागणी, 32 लिटर स्टोरेज आणि 78 Kmph टॉप स्पीड; जाणून घ्या किती आहे किंमत

Mahadev Jankar: मरेन पण हाती कमळ, धनुष्यबाण घेणार नाही: महादेव जानकर

May Month Horoscope : 10 मे रोजी बुध मंगळ राशीत करणार प्रवेश, या राशीच्या लोकांना होणार धनलाभ

Baramati Lok Sabha: कमी मतदानाचा कोणाला मिळणार फायदा? खडकवासला ठरवणार बारामतीचा खासदार?

SCROLL FOR NEXT