Sports

IPL 2024 GT vs SRH : मिलरची 'किलर' खेळी; गुजरात संघाचा ७ विकेट राखून विजय

Gujrat Titans Win: गुजरात आणि हैदराबाद या दोन्ही संघांचा यंदाच्या मोसमातील हा तिसरा सामना आहे. यापूर्वी झालेल्या 2 सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी एक सामना जिंकला आणि एक सामना गमावलाय.

Bharat Jadhav

Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad :

आपल्या होम ग्राऊंडवर खेळणाऱ्या आणखी एका संघाने विजय मिळवलाय. गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सच्या संघाने ७ विकेट राखत हैदराबादचा पराभव केला. गुजरात संघातील मिलरने किलर षटकार लगावत संघाला विजय मिळवून दिला. (Latest News)

आयपीएल २०२४चा १२ वा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबादमध्ये झाला. गुजरातने हा सामना ७ विकेट राखत जिंकलाय. हैदराबादने दिलेलं आव्हान गुजरातच्या संघाने ३ विकेट गमावत पार केलं. गुजरातकडून साई सुदर्शनने शानदार फलंदाजी करत ४५ धावांची दमदार खेळी केली. तर मिलरने नाबाद राहत ४४ धावा केल्या. मिलरने 'किलर' षटकार ठोकत गुजरातला या हंगामातील दुसरा विजय मिळवून दिला.

याआधी गुजरात संघाच्या गोलंदाजीने आपली कामगिरी शानदार पार पाडली. मोहित शर्माने ३ विकेट घेत सनरायझर्स हैदराबादला १६२ धावांपर्यंत रोखले. सामन्याच्या सुरुवातीला हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी कर्णधार पॅट कमिन्स आपल्या विजयाविषयी सकारात्मक होता. परंतु सुरुवातीलाच मिळालेल्या धक्क्यानंतर कमिन्सचा आत्मविश्वास कमी झाला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांना खास कामगिरी करता आली नाही. एकाही फलंदाजाला ३० धावांचा पल्ला गाठता आला नाही.

अभिषेक शर्मा आणि अब्दुल समद यांनी सर्वाधिक २९-२९ धावा केल्या. हेन्रिक क्लासेन २४ धावा करून बाद झाला. एडन मार्कराम २२ धावा करून तंबूत परतला. तर सलामीवीर मयंक अग्रवाल १६ आणि ट्रॅव्हिस हेड १९ धावा करत स्वस्तात तंबूत परतले. अशा खेळीमुळे हैदराबादचा संघ कसा १६२ धावांपर्यंत पोहोचू शकला. हैदराबादने दिलेल्या १६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातने चांगली सुरुवात केली. गुजरात संघाचा साई सुदर्शनने शानदार फलंदाजी करत ४५ धावा केल्या.

नाबाद राहणाऱ्या डेविड मिलरने २७ चेंडूंमध्ये ४४ धावा केल्या. मिलरला विजय शंकरची साथ मिळाली, त्यानेही नाबाद राहत १४ धावांचं योगदान दिलं. मिलर 'किलर' षटकार मारत गुजरात संघाला विजय मिळवून दिला. मिलरलने आपल्या खेळीत ४ चौकार आणि २ षटकार मारलेत. तर ३६ चेंडूत ४५ धावा करणाऱ्या साई सुदर्शनने ४ चौकार आणि १ षटकार मारला. यासह कर्णधार शुभमन गिलने ३६ धावा केल्या तर ऋद्धिमान साहाने २५ धावा केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

Relationship Tips : रिलेशनशिपमध्ये सतत भांडणं का होतात?

Maharashtra Politics: ठाकरे ब्रॅंड असता, तर बाळासाहेब असतानाच 288 आमदार आले असते - संजय गायकवाड|VIDEO

SCROLL FOR NEXT