IPL 2024 Final Ticket Price and how to book IPL final ticket amd2000 saam tv
Sports

IPL 2024 Final: चेन्नईत रंगणार फायनलचा थरार! तिकीट कसं बुक करायचं अन् सर्वात स्वस्त तिकिटाची किंमत किती?

IPL 2024 Final Ticket Price And Process: आयपीएल २०२४ स्पर्धेचा अंतिम सामना चेन्नईचा एमए चिदंबरम स्टेडियममध्ये रंगणार आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने समाप्त झाले असून, प्लेऑफच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद आणि, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या चारही संघांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. या स्पर्धेतील फायनलचा सामना २६ मे रोजी रंगणार आहे. या सामन्यासाठी तिकीट विक्रीला सुरुवात झाली आहे. दरम्यान तिकीट कसं बुक करायचं आणि किंमत किती असेल? जाणून घ्या.

कसं करायचं बुकिंग?

आयपीएल स्पर्धेच्या फायनलचं तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला patym insider ॲप डाउनलोड करावं लागेल किंवा सांकेतिक स्थळावर जाऊनही तुम्ही तिकीट बुक करू शकता. त्यासाठी तुम्हाला ॲपमध्ये जाऊन चेन्नई सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर आयपीएल २०२४ स्पर्धेच्या फायनलचं ऑप्शन सिलेक्ट करा. फायनलवर क्लिक केल्यानंतर buy now चं ऑप्शन दिसेल. त्यानंतर स्टँड आणि सीट सिलेक्ट करा. हवी ती सीट सिलेक्ट करून त्यावर क्लिक करा पैसे द्या आणि तिकीट बुक झालं.

तिकिटांची किंमत किती?

आयपीएल २०२४ स्पर्धेची फायनल पाहायची असेल तर तुम्हाला कमीत कमी ३५०० ते महाग तिकीट ७५०० पर्यंत असणार आहे. सध्या रूपे कार्ड धारकांसाठी तिकीट बुकिंग सुरू आहे. त्यानंतर सर्वांसाठी ही बुकिंग सुरू होईल.

असं आहे प्लेऑफच्या सामन्यांचं वेळापत्रक :

क्वालिफायर - १

कोलकाता विरुद्ध हैदराबाद - २१ मे

एलिमिनेटर

राजस्थान विरुद्ध बंगळुरू -२२ मे

क्वालिफायर -२

क्वालिफायर - १ पराभूत संघ - एलिमिनेटर विजेता संघ - २४ मे

फायनल - २६ मे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Ganghi: मतं चोरुन मोदी पंतप्रधान बनले; राहुल गांधींचा आरोप

Crime News: महिलेच्या पाठीमागून आला अन्...; 'गला घोंटू' गँगची दहशत|Video Viral

Pranjal Khewalkar : एकनाथ खडसे खडसेंच्या जावयाचा पाय आणखी खोलात, रुपाली चाकणकरांचा मानवी तस्करीचा आरोप

Nanded News: कुत्रा चावल्यानं म्हैस दगावली; गावकरी पडले चिंतेत, लसीसाठी हॉस्पिटलमध्ये लावली रांग, कारण काय?

Raksha Bandhan : सरकारकडून रक्षाबंधनाला 2 हजारांचं गिफ्ट? लाडकींना रक्षाबंधनाला कॅशबॅक मिळणार?

SCROLL FOR NEXT