Abhishek Porel Batting Video Saam tv
क्रीडा

Abhishek Porel Batting Video : २१ वर्षाच्या इम्पॅक्ट प्लेअरच्या खेळीनं सर्वच 'इम्प्रेस', दमदार फटकेबाजीने पंजाबचं वाढलं टेन्शन

Abhishek Porel Batting Video viral : फलंदाजीच्या क्रमवारीत ९ व्या स्थानावर फलंदाजीसाठी उतरलेल्या २१ वर्षांच्या अभिषेक पोरेलने अफलातून फलंदाजी केली. अभिषेक गोलंदाजांना चोपत संघाची धावसंख्या १७४ पर्यंत पोहोचवली.

Vishal Gangurde

Abhishek Porel Batting Video :

इंडियन प्रीमियर लीगच्या १७ व्या हंगामात आज शनिवारी दिल्ली कॅपिटल्सचा सामना पंजाब किंग्ससोबत झाला. पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकल्यानंतर दिल्लीचे खेळाडू प्रथम फलंदाजीसाठी उतरले. यावेळी दिल्लीच्या फलंदाजांची चांगलीच पडझड पाहायला मिळाली. मात्र, फलंदाजीच्या क्रमवारीत ९ व्या स्थानावर फलंदाजीसाठी उतरलेल्या २१ वर्षांच्या अभिषेक पोरेलने अफलातून फलंदाजी केली. अभिषेक गोलंदाजांना चोपत संघाची धावसंख्या १७४ पर्यंत पोहोचवली. (Latest Marathi News)

दिल्ली कॅपिटल्स संघाच्याविरुद्ध पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे ऋषभ पंतने कार अपघातानंतर पहिला सामना खेळला. दिल्लीच्या फलंदाजीची सुरुवात चांगली झाली. मात्र, काही षटकानंतर दिल्ली फलंदाजी ढेपाळली. दिल्लीने १२८ धावांपर्यंत ६ गडी गमावले. दिल्लीचा संघ अडचणीत असताना इम्पॅक्ट खेळाडूच्या रुपात २१ वर्षीय अभिषेक पोरेल मैदानात उतरला.

२१ वर्षीय अभिषेकची दमदार फटकेबाजी

पंजाब किंग्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सने ९ गडी गमावून २० षटकात १७४ धावसंख्या उभारली. संघाची धावसंख्या १७४ पर्यंत पोहोचवण्यासाठी अभिषेकने मोलाची भूमिका निभावली. त्याने अवघ्या १० चेंडूत ३२ धावा कुटल्या.

३२० च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करत ४ चौकार आणि २ षटकार लगावले. दिल्लीने १४७ केल्या, तेव्हा संघाचे ८ गडी बाद झाले होते. त्यानंतर उतरलेल्या अभिषेकच्या दमदार खेळीमुळे संघाची धावसंख्या १७४ पर्यंत पोहोचली.

ऋषभ पंतचं कमबॅक

ऋषभ पंतचा डिसेंबर २०२२ मध्ये अपघात झाला होता. अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे ऋषभ हा अनेक दिवस उपचार घेत होता. या अपघातानंतर पहिल्यांदा क्रिकेट सामना खेळण्यास उतरलेल्या ऋषभने आज फारशी चांगली कामगिरी केली नाही. ऋषभने १३ चेंडूचा सामना करत १८ धावा केल्या. या डावात त्याच्या २ चौकारांचा सामावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हनिमूनला जायचा विचार करताय का? भारतातील 'ही' ५ ठिकाणे आहेत प्रसिद्ध

Maharashtra News Live Updates: कार्तिकी यात्रेत विठ्ठल चरणी साडेतीन कोटींचे दान

लठ्ठपणामुळे मधुमेह होतो का? या दोघांमधील संबंध समजून घ्या...

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT