IPl 2024 DC vs SRH Saam Digital
क्रीडा

IPl 2024 DC vs SRH : घरच्या मैदानावर दिल्लीचा दारुण पराभव; हैदराबादच्या संघाकडून पुन्हा एकदा स्फोटक फलंदाजीचं प्रदर्शन

Delhi Capitals and Sunrisers Hyderabad : सनरायझर्स हैदराबादने स्फोटक फलंदाजी करत २६७ धावांचा डोंगर उभारला होता, तो सर करताना दिल्लीच्या फलंदाजांनी अक्षरश: गुडघे टेकले आणि केवळ सर्वबाद १९९ धावांपर्यंत मजल मारता आली. हैदराबादचा ६८ धावांनी दणदणीत विजय झाला.

Sandeep Gawade

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम या घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. सनरायझर्स हैदराबादने स्फोटक फलंदाजी करत २६७ धावांचा डोंगर उभारला होता, तो सर करताना दिल्लीच्या फलंदाजांनी अक्षरश: गुडघे टेकले आणि केवळ सर्वबाद १९९ धावांपर्यंत मजल मारता आली. हैदराबादचा ६८ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

सनरायझर्स हैदराबाद, स्फोटक फलंदाजी आणि मोठ्या धावसंख्येचा ट्रेंड आयपीएल 2024 मध्ये सुरू आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली या संघाची विजयी मालिका सुरूच आहे. आयपीएलच्या विक्रमी धावसंख्येच्या आधारे मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभूत करणाऱ्या सनरायझर्सने दिल्ली कॅपिटल्सवर विरुद्धही मोठी कामगिरी केली आणि सीझनमधील चौथा विजय नोंदवला.

आयपीएलच्या गेल्या 16 सीझनमध्ये स्फोटक फलंदाजी अनेकदा पाहायला मिळाली आहे. ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स, ब्रेंडन मॅक्युलम सारखे अनेक फलंदाज आहेत, ज्यांनी गोलंदाजांना झोडपून काढलं आहे, परंतु ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी आज स्फोटक फलंदाजीचा कहर केला.

दिल्लीनेही सुरुवातीपासून जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. पहिल्या षटकात सलग 4 चौकार मारून सुरुवात केली. पृथ्वी शॉने वॉशिंग्टन सुंदरला लक्ष्य केले पण त्याने ५व्या चेंडूवर त्याची विकेट दिली. डेव्हिड वॉर्नरचे खराब पुनरागमन झाले आणि तो स्वस्तात बाद झाला. पण युवा फलंदाज जेक फ्रेझर मॅकगर्कने तिसऱ्या षटकात सुंदरवर 3 चौकार आणि 3 षटकार मारत 30 धावा केल्या. त्यानंतर त्याने मयंक मार्कंडेला सलग 3 षटकार ठोकले आणि अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक केले, जे या मोसमातील सर्वात वेगवान अर्धशतक ठरले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuljabhavani Mandir : तुळजाभवानी मंदिराला पावणेतीन कोटींचे उत्पन्न; भाविकांमार्फत ६५३ ग्रॅम सोने व १३ किलो चांदी अर्पण

Peanut And Jaggery: थंडीमध्ये शेंगदाणे-गुळ खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

Tongue Taste Change: 'या' आजारांमुळे अचानक बदलते जीभेची चव; दुर्लक्ष करणं तुम्हाला पडेल महागात

Porsche Accident : पोर्शे अपघाताला ६ महिने पुर्ण; रस्त्यावर उतरत तरुणाईची मेणबत्ती पेटवून आदरांजली

Dance Viral Video: महिलांची कमाल! नऊवारी साडी नेसून महिलांनी धरला 'ही पोरगी असली' गाण्यावर ठेका;Video व्हायरल

SCROLL FOR NEXT