travis head  twitter
Sports

IPL 2024 Auction: टीम इंडियाला नडणारा ट्रेविस हेड हैदराबादच्या ताफ्यात! लागली इतक्या कोटींची बोली

Travis Head IPL Auction: आयपीएल २०२४ स्पर्धेच्या बहुप्रतिक्षित लिलाव सोहळ्याला प्रारंभ झाला आहे. हा लिलाव सोहळा दुबईत सुरु आहे

Ankush Dhavre

Travis Head, IPL 2024 Auction:

आयपीएल २०२४ स्पर्धेच्या बहुप्रतिक्षित लिलाव सोहळ्याला प्रारंभ झाला आहे. हा लिलाव सोहळा दुबईत सुरु आहे. वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज रोमेन पॉव्हेल या लिलावात विकला जाणारा पहिला खेळाडू ठरला. त्याला राजस्थानने ७.४० कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं. दरम्यान वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलमध्ये भारतीय संघाला नडणाऱ्या ट्रेविस हेडवर मोठी बोली लागली आहे.

ट्रेविस हेड सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात..

ट्रेविस हेडला सनरायझर्स हैदराबादने ६.८० कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले आहे. त्याची बेस प्राईज २ कोटी रुपये इतकी होती. ट्रेविस हेडचं नाव येताच चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद या दोघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळली.

दोन्ही संघ माघार घ्यायला मागत नव्हते. अखेर ६.८० कोटींच्या बोलीवर चेन्नई सुपर किंग्जने माघार घेतली आणि ट्रेविड हेड सनरायझर्स हैदराबादच्या संघात दाखल झाला. (Latest sports updates)

अशी राहिलीये कामगिरी..

ट्रेविड हेडने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत दमदार कामगिरी केली होती. त्याने भारतीय संघाविरुद्ध झालेल्या वर्ल्डकप फायनलमध्ये १३७ धावांची मॅचविनिंग खेळी केली होती. या खेळीच्या बळावर त्याने ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला होता.

ट्रेविड हेडच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने २३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५५४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १ अर्धशतक झळकावलं आहे. तर टी-२० कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने १०७ सामन्यांमध्ये २४९४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १ शतक आणि १० अर्धशतकं झळकावली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv : गुरुजी, आमच्या शाळेतून जाऊ नका ना! म्हणत विद्यार्थ्यांनी हंबरडा फोडला | पाहा VIDEO

Pune Crime: मंदिरात घेऊन गेला, मंत्रोच्चार करत अघोरी विधी; अंगाऱ्याचा पेढा खायला दिला, नंतर महिलेसोबत...

Maharashtra Live News Update : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 सप्टेंबरला

Crime News : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाची बीडमध्ये पुनरावृत्ती, विवाहानंतर दोन महिन्यांतच सासरकडून छळ, तरुणीचा मृत्यू

Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये जोरदार हाणामारी, बुक्क्यांनी एकमेकांना फोडलं |VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT