who is mallika sagar saam tv news
Sports

Who Is Mallika Sagar: यंदाच्या IPL लिलावात दिसणार मल्लिका! BCCI सोपवणार मोठी जबाबदारी?

Who Is Auctioneer Mallika Sagar: आयपीएल २०२४ स्पर्धेच्या लिलावाची तारीख निश्चित झाली आहे. येत्या १९ डिसेंबर रोजी दुबईत आयपीएल २०२४ स्पर्धेचा लिलाव होणार आहे.

Ankush Dhavre

IPL 2024 Auction:

आयपीएल २०२४ स्पर्धेच्या लिलावाची तारीख निश्चित झाली आहे. येत्या १९ डिसेंबर रोजी दुबईत आयपीएल २०२४ स्पर्धेचा लिलाव होणार आहे. पहिल्यांदाच या स्पर्धेचा लिलावा भारताबाहेर होणार आहे. लिलावात कोणत्या खेळाडूवर सर्वाधिक बोली लागणार आणि कोणता खेळाडू अनसोल्ड होणार यावर सर्वांचं लक्ष लागून असतं. दरम्यान यावेळी सर्वांच्या नजरा खेळाडूंसह ऑक्शनरवर टिकून राहु शकतात.

माध्यमातील वृ्त्तानुसार, आगामी आयपीएल लिलावात मल्लिका सागर ऑक्शनरच्या भूमिकेत दिसून येऊ शकते. मात्र बीसीसीआयने याबाबत कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मल्लिका सागर हे नाव अनेकांनी पहिल्यांदाच ऐकलं असावं. (Who Is Mallika Sagar)

मात्र तिने यापूर्वीही आयपीएल स्पर्धेत ऑक्शनरची भूमिका पार पाडली आहे. गतवर्षी तिने महिलांच्या आयपीएल स्पर्धेत होस्टची भूमिका पार पाडली होती. माध्यमातील वृत्तानुसार बीसीसीआयने तिला आयपीएलचा लिलाव होस्ट करण्याची ऑफर दिली आहे. तिने अजून होकार कळवलेला नाही. जर तिने होकार दिला, तर आगामी लिलावात ती ऑक्शनरच्या भूमिकेत दिसून येऊ शकते. (Latest sports updates)

मल्लिका सागर आहे तरी कोण?

महिलांच्या आयपीएल स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात तिने ऑक्शनरची भूमिका बजावली होती.येत्या ९ डिसेंबर रोजी वुमेन्स प्रिमियर लिग २०२४ स्पर्धेसाठीचा लिलाव पार पाडणार आहे. मल्लिका सागरबद्दल बोलायचं झालं तर तिने फिलाडेल्फियामध्ये ब्रायन मावर कॉलेजमधून इतिहास या विषयातू पदवी घेतली आहे. त्यानंतर २००१ मध्ये तिने क्रिस्टीमध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. २०२१ मध्ये झालेल्या प्रो कबड्डीच्या लिलावात तिने महत्वाची भूमिका बजावली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS Transfer: महापालिका निवडणुकीआधीच बड्या IAS अधिकाऱ्याची बदली, अविनाश ढाकणे BMC चे नवे अतिरिक्त आयुक्त

Maharashtra Politics : भाजपचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; चव्हाणांकडून बालेकिल्ल्याला खिंडार, VIDEO

Shocking: सॉफ्टवेअर इंजिनिअरची आत्महत्या, नव्या घरात घेतला गळफास; १० पानी सुसाईड नोटमध्ये लिहिलं धक्कादायक कारण...

Vladimir Putin: परम बलशाली पुतीनची महिला ब्रिगेड, रशियातील 10 शक्तीशाली महिला

MahaYuti Face Clash: महायुतीत वाहताहेत स्वबळाचे वारे; निवडणुकीआधी भाजप-सेना युती तुटणार?

SCROLL FOR NEXT