Chennai Super Kings vs Punjab Kings X IPl
क्रीडा

IPL 2024 : जडेजाच्या ऑलराउंडर खेळीने पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न भंगलं; Points Table मध्ये CSKची टॉप-३ मध्ये एंट्री

Chennai Super Kings vs Punjab Kings: धर्मशालाच्या स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने शानदार कामगिरी करत २८ धावांनी विजय मिळवला. या विजयासह चेन्नई सुपर किंग्स संघाने पॉईंट्स टेबलमध्ये टॉप-३ मध्ये प्रवेश केलाय.

Bharat Jadhav

आयपीएल २०२४ च्या ५३ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने पंजाब किंग्सला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केलं. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सीएसकेने यंदाच्या मोसमातील हा सहावा विजय मिळवलाय.

या विजयासह सीएसकेने पॉईंट्स टेबलमध्ये भरारी घेतली असून टॉप-३ मध्ये पोहोचलाय. सीएसकेने नाणेफेक गमावली होती, पण पंजाबने त्यांना प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिलं. चेन्नईच्या संघाने २० षटकात ९ गडी गमावून १६७ धावा करत पंजाबसमोर १६८ धावांचे आव्हान ठेवलं.

या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्सच्या फलंदाजांची खराब कामगिरी झाली. २० षटक खेळल्यानंतर पंजाबने संघाला ९ विकेट्सवर केवळ १३९ धावा केल्या. पंजाबला पराभूत करत चेन्नईने १२ गुण मिळवत पॉईट्स टेबलमध्ये ३ स्थान गाठलंय. तर चेन्नईकडू मिळालेल्या पराभवामुळे पंजाब संघाच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा संपुष्टात आल्यात. पंजाब किंग्सचा या हंगामातील हा ७ वा पराभव आहे. पंजाब संघ ८ गुणांसह पॉईंट्स टेबलमध्ये ८ व्या स्थानावर आहे.

IPL 2024 point table

सीएसकेच्या विजयात रविंद्र जडेजाने महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात रविंद्र जडेजाने अष्टपैलू कामगिरी केली. जडेजाने प्रथम फलंदाजी करताना चेन्नईच्या संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढत सन्मानजनक धावसंख्येवर नेलं. जडेजाने २६ चेंडूत २ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ४३ धावांची खेळी केली. यानंतर गोलंदाजी करताना त्याने पंजाब किंग्सची फलंदाजी उद्ध्वस्त केली. जडेजाने ४ षटकांत अतिशय किफायतशीर गोलंदाजी केली. केवळ २८ धावा देत ३ महत्त्वाचे बळी घेतले.

चेन्नईच्या संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्सचे फलंदाज फ्लॉप ठरले. जॉनी बेअरस्टो (७धावा) आणि रिले रौसो (० धावा) एकापाठोपाठ एक बाद झाल्याने पंजाबचा डाव सुरुवातीलाच खिळखिळा झाला होता. प्रभासिमरन आणि शशांकने पंजाबचा डाव सांभाळला, पण संघाने ६२ धावा केल्या असताना शशांक २७ धावा करून बाद झाला. यानंतर विकेट्सची घसरगुंडी सुरू झाली. अवघ्या १०० धावांच्या आतच संघाने आपले ७ फलंदाज गमावलेत. सीएसकेकडून गोलंदाजी करताना जडेजा व्यतिरिक्त सिमरजित सिंग आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. मिचेल सँटनर आणि शार्दुल ठाकूर यांना १-१ विकेट मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS, Playing XI: रोहितचा पर्याय सापडला! पर्थ कसोटीसाठी टीम इंडिया या 11 खेळाडूंसह उतरणार मैदानात

Nashik News : मोठी बातमी! नाशिकमध्ये ५ कोटींचं घबाड सापडलं, नेत्यासह गाडीही ताब्यात

Maharashtra News Live Updates: पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Night Skin Care: झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा किचनमधील 'या' गोष्टी; सकाळी मोत्याप्रमाणे चमकेल चेहरा

Rajesh Pawar News : भाजप आमदाराची सभा गावकऱ्यांनी उधळली! राजेश पवार यांच्या सभेत गोंधळ | VIDEO

SCROLL FOR NEXT