IPL 2023, BCCI / Social Media saam tv
Sports

IPL 2023 Auction: 'या' 5 भारतीय खेळाडूंवर बंदीची शक्यता, IPL 2023 स्पर्धेआधीच BCCI चा मोठा निर्णय

IPL 2023 Auction Latest : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या महापर्वासाठी कोच्चीमध्ये मिनी ऑक्शन सुरू होत आहे. या ऑक्शनमध्ये सर्व फ्रेंचाइजी संघ आपल्या आवडत्या खेळाडूंवर मोठी बोली लावणार आहेत

साम टिव्ही ब्युरो

IPL 2023 Auction Latest : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या महापर्वासाठी कोच्चीमध्ये मिनी ऑक्शन सुरू होत आहे. या ऑक्शनमध्ये सर्व फ्रेंचाइजी संघ आपल्या आवडत्या खेळाडूंवर मोठी बोली लावणार आहेत. या लिलावाआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. या वृत्तानंतर फ्रेंचाइजी खूपच अॅलर्ट राहून या संपूर्ण प्रक्रियेत सहभाग घेणार आहे. बीसीसीआयकडून पाच भारतीय खेळाडूंची नावं देण्यात आली आहे, ज्यांच्यावर बंदी घातली जाऊ शकते.

क्रिकबझच्या एका रिपोर्टनुसार, बीसीसीआयनं (BCCI) आयपीएलच्या सर्व फ्रेंचाइजी संघांना एक मेल पाठवला आहे. त्यात एकूण पाच खेळाडूंची नावं आहेत. त्यांच्यावर बीसीसीआयकडून बंदी घातली जाऊ शकते. यामुळे हे पाच खेळाडू कोण अशी चर्चा सुरू झाली आहे. (IPL 2023)

बीसीसीआयनं हा मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईचा फिरकीपटू तनुश कोटियन याचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानं स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. अलीकडेच झालेल्या रणजी सामन्यात त्यानं हैदराबादविरुद्ध सात विकेट घेतल्या होत्या. (Cricket News)

याशिवाय, केरळचा रोहन, विदर्भातील अपूर्व वानखेडे, गुजरातचा चिराग गांधी आणि महाराष्ट्राच्या रामकृष्णन घोष यांचा या यादीत समावेश आहे. ज्यांच्या अॅक्शनविषयी साशंकता आहे. बीसीसीआयकडून चौकशी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच याविषयी निर्णय घेता येणार आहे. चौकशीत अॅक्शनमध्ये काही चुकीचं आढळून आल्यास त्यांच्यावर बंदी घातली जाऊ शकते.

गोलंदाजी शैली संशयास्पद आढळल्यानंतर जगभरातील अनेक खेळाडूंवर बंदी घालण्यात आली आहे. कोलकाता नाइटरायडर्सचा प्रमुख गोलंदाज सुनील नरेन याच्या गोलंदाजी शैलीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. त्याने प्रत्येकवेळी गोलंदाजी शैलीत सुधारणा करून पुनरागमन केलं. अरमान जाफर, कर्नाटकचा मनीष पांडे, बंगालचा चटर्जी, महाराष्ट्राचा अजीम काझी यांना गोलंदाजी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fake Notes : नकली नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तीन जाणांविरोधात गुन्हा दाखल

Train Ticket Conformation Tips : दिवाळीला गावी जायचंय, पण तिकीट कन्फर्म नाही, 'या' टिप्स करा फॉलो

निवडणूक आयोगाला 2 लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा जोरदार दणका, काय आहे प्रकरण? VIDEO

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना फटका

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

SCROLL FOR NEXT