IPL 2023: आयपीएल २०२३ च्या लिलावाला काही तास शिल्लक आहेत. शुक्रवारी(२३,डिसेंबर) ला कोच्चीमध्ये होणाऱ्या या लिलावात 405 खेळाडूंवर बोली लागणार आहे. ज्यामध्ये कोणत्या खेळाडूला सर्वाधिक मानधन मिळणार? कोण होणार मालामाल? याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
या मिनी ऑक्शनमध्ये ३० विदेशही खेळाडूंसह ८७ जागा भरल्या जातील. ज्यामध्ये तीन खेळाडूंच्या नावाची सर्वाधिक चर्चा असून या खेळाडूंवर सर्वाधिक बोली लावण्याची शक्यता आहे. बेन स्टोक्स, सॅम करण आणि कॅमरन ग्रीन या खेळाडूंसाठी दहा संघांमध्ये चढाओढ लागेल.
याबाबत अधिक माहिती अशी की, आयपीएल (IPL) लिलावात सर्वोत्तम खेळाडूला आपल्या ताफ्यात सामील करण्यासाठी सर्वच संघांमध्ये स्पर्धा लागेल. यामध्ये बेन स्टोक्स, सॅम करण आणि यांच्यावर सर्वच संघ मोठी किंमत खर्च करण्याची शक्यता आहे. टी20 विश्वचषक 2022 चा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड झालेल्या सॅम करणवर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. तो फक्त 24 वर्षांचा आहे आणि त्याची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचे आहे.
सॅम करणला 2019 मध्ये पंजाबने मोठ्या रकमेत खरेदी केले होते, परंतु त्यानंतर तो चेन्नई संघात सामील झाला. चेन्नई (CSK) त्याला पुन्हा आपल्या संघाशी जोडण्याचा प्रयत्न करेल. पाठीच्या दुखापतीमुळे करण गेल्या हंगामात खेळला नव्हता. करणशिवाय इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स आणि फॉर्मात असलेला फलंदाज हॅरी ब्रूक यांनाही मोठी किंमत मिळू शकते. ब्रुकने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आपली योग्यता यापूर्वीच सिद्ध केली आहे. त्याने पाकिस्तान दौऱ्यावर सलग तीन शतके ठोकून दमदार फॉर्म दाखवला आहे.
सर्वांच्या नजरा ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमेरून ग्रीनवरही असतील. या वर्षाच्या सुरुवातीला भारतात झालेल्या वनडे मालिकेत त्याने ऑस्ट्रेलियासाठी डावाची सुरुवात चांगली केली होती. या लिलावात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनचाही समावेश आहे. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये आहे.
इंग्लंडचा माजी कर्णधार जो रुटही प्रथमच आयपीएल लिलावात उतरत आहे. झिम्बाब्वेचा अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझाही फ्रँचायझींच्या नजरेत असेल. गेल्या 12 महिन्यांत त्याने टी-20 क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आता कोणत्या परदेशी खेळाडूवर मोठ्या रकमेचा वर्षाव होणार हे पाहावे लागेल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.