IPL 2023 PBKS vs KKR Match Updates Saam TV
Sports

PBKS vs KKR, IPL 2023 : पावसाने बिघडवला खेळ! DLS च्या नियमानुसार पंजाबचा कोलकातावर ७ धावांनी विजय

IPL 2023 PBKS vs KKR Match : पंजाब किंग्जने कोलकाता नाईट राईडर्सचा ७ धावांनी पराभव केला.

Satish Daud

IPL 2023 PBKS vs KKR Match Updates : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या १६ व्या हंगामाचा दुसरा सामना आज शाखरुख खानच्या कोलकाता नाईट राईडर्स आणि प्रीती झिंटाच्या पंजाब किंग्ज या दोन संघादरम्यान झाला. या सामन्यात पंजाब किंग्जने कोलकाता नाईट राईडर्सचा ७ धावांनी पराभव केला. पंजाबने कोलकातासमोर १९१ धावांचं आव्हान उभं ठेवलं होतं. (Latest sports updates)

या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या केकेआरने पहिल्यापासूनच आक्रमक फलंदाजी केली. मात्र, या आक्रमक फलंदाजीचा त्यांना फटका देखील बसला. पहिल्या १० षटकापर्यंत केकेआरला फक्त ८० धावा करता आल्या. त्यात त्यांनी ४ फलंदाजांना गमावलं होतं.

पंजाबचा डावखुरा गोलंदाज अर्शदीप सिंगने गोलंदाजीचा भेदक मारा करून कोलकाताच्या तीन फलंदाजांना झटपट माघारी पाठवलं. परिणामी केकेआरची अवस्था १६ षटकांत ७ बाद १४६ अशी झाली. विजयासठी कोलकाताना ४ षटकांत ४६ धावांची गरज होती.

आंद्रे रसेल आणि व्यंकटेश अय्यरने आक्रमक खेळी केली. मात्र, त्यांचे हे प्रयत्न अपूर्ण पडले. शेवटचे काही षटकं बाकी असताना सामन्यात (Cricket News) पावसाने खोडा घातला. त्यामुळे डकवर्थ लुईसच्या नियमानुसार पंजाबचा ७ धावांनी विजय झाला.

तत्पुर्वी कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम पंजाब किंग्जला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं. मोहालीच्या पाटा खेळपट्टीवर पंजाबने देखील दमदार सुरूवात करत ५ षटकात ५० धावा कुटल्या. सलामीवीर प्रभसिमरन सिंगने १२ चेंडूत २३ धावा ठोकल्या. त्यानंतर तो बाद झाला.

प्रभसिमरन बाद झाल्यानंतर शिधर धवन आणि भानुका राजपक्षाने आक्रमक खेळ करण्यास सुरूवात केली. राजपक्षाने धडाकेबाज अर्धशतक ठोकत पंजाबला ११ व्या षटकात शतकी मजल मारून दिली. मात्र ३२ चेंडूत ५० धावा करून राजपक्षा बाद झाला.

त्यापाठोपाठ वरूण चक्रवर्तीने शिखर धवनचा ४० धावांवर त्रिफळा उडवला. ऐकवेळ पंजाबची अवस्था ४ बाद १४३ धावा अशी झाली होती. मात्र, शेवटच्या षटकात सिकंदर रजा आणि सॅम करनने सावध खेळी करत संघाला १९१ धावांपर्यंत पोहचवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पंढरीला जाताना वारकऱ्यांना लुटलं, मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपींना पकडतानाचा थराराक CCTV

Pune Tourism : रिमझिम पाऊस अन् पांढराशुभ्र धबधबा, पुण्यात लपलंय अद्भुत सौंदर्य

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

SCROLL FOR NEXT