ipl playoffs  saam tv
Sports

IPL 2023 Playoffs Schedule: प्लेऑफचे ४ संघ ठरले! कधी आणि कुठे रंगणार सामने? पाहा संपूर्ण वेळापत्रक

IPL 2023 Playoffs Fixtures: जाणून घ्या कोणता सामना कधी आणि कुठे रंगणार आहे.

Ankush Dhavre

IPL 2023: रविवारी आयपीएल २०२३ स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला गुजरात टायटन्स संघाकडून पराभव पत्करावा लागला.

या पराभवासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ बाहेर तर मुंबई इंडियन्स संघाला प्लेऑफमध्ये प्रवेश मिळाला आहे. यासह आयपीएल २०२३ स्पर्धेतील प्लेऑफमध्ये जाणारे ४ संघ निश्चित झाले आहेत.

आता लवकरच प्लेऑफचे सामने सुरू होणार आहेत. दरम्यान जाणून घ्या कोणता सामना कधी आणि कुठे रंगणार आहे.

क्वालिफायर १ चा सामना २३ मे रोजी गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात हार्दिक पंड्या आणि एमएस धोनी आमने सामने येणार आहेत.

तर एलिमिनेटजरचा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि ५ वेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हे दोन्ही संघ चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर रंगणार आहे. त्यानंतर क्वालिफायर २ आणि आयपीएल २०२३ स्पर्धेतील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होणार आहेत. (Latest sports updates)

असे आहे प्लेऑफच्या सामन्यांचे वेळापत्रक ..

क्वालिफायर १- गुजरात टायटन्स विरुध्द चेन्नई सुपर किंग्ज (२३ मे, एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई)

एलिमिनेटर - लखनऊ सुपर जायंट्स विरुध्द मुंबई इंडियन्स (२४ मे, एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई)

क्वालिफायर २ - क्वालिफायर १ पराभूत झालेला संघ विरुध्द एलिमिनेटरचा विजेता संघ (२६ मे, नरेंद्र मोदी स्टेडियम)

अंतिम सामना : क्वालिफायर १ चा विजेता संघ विरुध्द क्वालिफायर २ चा विजेता संघ (२८, नरेंद्र मोदी स्टेडियम)

गुजरातचा विजय अन् मुंबईची चांदी

रविवारी झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने विजय मिळवला. या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ प्लेऑफच्या शर्यतीतुन बाहेर झाला आहे. तर मुंबईचा संघ प्लेऑफमध्ये दाखल झाला आहे. आता मुंबई आणि लखनऊचा संघ एलिमिनेटरच्या सामन्यात आमने सामने येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : राज्यात राजकीय भूकंप, एकनाथ शिंदेंच्या गळाला लागला बडा मोहरा; शिवसेनेची ताकद वाढणार

EPFO 3.0: आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार पीएफचे पैसे; EPFO 3.0 लवकरच होणार लाँच

Maharashtra Live News Update: राज ठाकरेंच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी देवेंद्र फडणवीस जाणार

Ganesh Chaturthi 2025 LIVE Updates : विघ्नहर्ता, सुखकर्ता गणरायाचं वाजतगाजत आगमन, राज्यात उत्साहाचे वातावरण

Pandharpur : शेतकरी कर्जमाफी करण्याची गणरायाने सरकारला सुबुद्धी द्यावी; जनशक्ती शेतकरी संघटनेचे विविध ठिकाणी फलक

SCROLL FOR NEXT