Rohit Sharma
Rohit SharmaSaam tv

IPL 2023: रोहित शर्माने कमालच केली; आयपीएलमध्ये मुंबईसाठी केला मोठा विक्रम

Rohit Sharma News: आजच्या सामन्यात रोहितने तडाखेबाज खेळी खेळत मुंबईसाठी ५००० धावा पूर्ण केल्या.

Rohit Sharma News: आयपीएलच्या यंदाच्या हंगामात रोहित शर्माची बॅट चांगलीच तळपली. आजच्या सामन्यात हैदराबादविरोधात रोहितने तडाखेबाज खेळी खेळली. आजच्या सामन्यातच रोहितने मुंबई संघासाठी ५००० धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. रोहित मुंबईसाठी ५००० धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. (Latest Marathi News)

रोहित शर्माने टी२० क्रिकेट करिअरमध्ये भारतासाठी ११००० धावा पूर्ण केल्या आहेत. रोहित भारतासाठी टी२० करिअरमध्ये ११०००० धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. पहिल्या स्थानावर विराट कोहली आहे.

Rohit Sharma
IPL 2023, MI vs SRH: मुंबईला प्ले ऑफसाठी 'ग्रीन' सिग्नल? हैदराबादवर दणदणीत विजय

भारतासाठी टी२० क्रिकेटमध्ये सर्वात ११०००० धावा करणारा फलंदाज विराट कोहली आहे. तर आता दुसऱ्या स्थानावर रोहित शर्मा पोहोचला आहे. विराट कोहलीच्या या क्लबमध्ये रोहित शर्मा सामील झाला आहे.

रोहित शर्माने हैदराबादच्या विरोधात ३१ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. रोहित शर्माने आजच्या सामन्यातच ५००० धावा पूर्ण केल्या. विराट कोहलीनंतर रोहित शर्मा हा कोणत्याही एका संघासाठी ५००० हजार धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. विराट कोहलीने या आधी एका संघासाठी ७१६२ धावा पूर्ण केल्या आहेत.

टी२० सामन्यात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

११८६४ धावा - विराट कोहली

११०१६ धावा- रोहित शर्मा

९६४५ धावा - शिखर धवन

८६५४ धावा- सुरेश रैना

७२७२ धावा- रॉबिन उथप्पा

७२६५ धावा - एमएस धोनी

Rohit Sharma
Gautam Gambhir On Rinku Singh: LSG चा घाम काढणाऱ्या रिंकूचा जबरा फॅन झालाय Gambhir; ट्विट करत केला कौतुकाचा वर्षाव

मुंबईचा हैदराबादवर दणदणीत विजय

मुंबई इंडियन्सने अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात सनसायझर्स हैदराबादवर 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. पहिली फलंदाजी करताना हैदराबादने मुंबईसमोर 201 धावांचं मोठं आव्हान ठेवलं होतं. मुंबईने हैदराबादचे हे आव्हान अवघ्या 18 षटकातं पूर्ण केले.

कॅमरॉन ग्रीनने मुबंईसाठीच्या 'करो या मरो' सामन्यात धडाकेबाज शतक साजरं केलं. कर्णधार रोहित शर्माची बॅटही महत्त्वाच्या सामन्यात तळपली. शेवटी सूर्यकुमार यादवनेही तुफान फटकेबाजी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com