IPL 2023 Mumbai Indians Beat Lucknow Super Giants Gautam Gambhir Reaction
IPL 2023 Mumbai Indians Beat Lucknow Super Giants Gautam Gambhir Reaction Saam TV
क्रीडा | IPL

Gautam Gambhir Reaction: मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर गौतम गंभीरचं सूचक ट्विट; म्हणाला, "पडलो पण..."

Satish Daud-Patil

Mumbai Indians Beat Lucknow Super Giants Gautam Gambhir Reaction: आयपीएल 2023 स्पर्धेच्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सचा ८१ धावांनी पराभव केला. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच मुंबई इंडियन्सने लखनौला पराभूत केले. (Latest sports updates)

८१ धावांनी मोठा विजय मिळवून मुंबईने फायनलकडे कूच केली, तर लखनऊचे यंदाच्या हंगामातील आव्हान संपुष्टात आले आहेत. दरम्यान, या पराभवानंतर लखनऊचा मेंटॉर गौतम गंभीरने एक सूचक ट्विट केलं आहे.

प्लेऑफच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या सामन्यात  मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईने सुरूवातीपासूनच शानदार कामगिरी केली. त्यामुळे सांघिक खेळीच्या जोरावर संघाने निर्धारित २० षटकांत ८ गडी गमावून १८२ धावा केल्या.

१८३ धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौच्या फलंदाजांना घाम फुटला. मुंबईचा आकाश मधवाल लखनौच्या नवाबांसाठी काळ ठरला. आकाशने केवळ ३.३ षटकांत ५ धावा देऊन ५ बळी घेतले. लखनौचा संघ २० षटकं देखील खेळू शकला नाही अन् १६.३ षटकांतच १०१ धावांवर सर्वबाद झाला.  (Indian Premier League 2023)

मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर गौतम गंभीरचं सूचक ट्विट

दरम्यान, आपल्या संघाच्या पराभवानंतर संघाचा मेटॉंर गौतम गंभीरने चाहत्यांचे आभार मानताना त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. "पडलो पण हरलो नाही. अफाट प्रेम दाखवल्याबद्दल चाहत्यांचे खूप खूप आभार.", असं म्हणत गौतम गंभीरने चाहत्यांचे आभार मानले. गंभीरच्या या ट्विटने सर्वांचीच मने जिंकली आहे.

गौतम गंभीरची लखनऊमधून हकालपट्टी होणार?

दरम्यान, मुंबईविरुद्धच्या पराभवामुळे गौतम गंभीर नाराज दिसत होता. यानंतर लखनऊचे टीम मालक (Cricket News) संजीव गोयंका यांच्यासोबतचा एक फोटो खूप व्हायरल होत आहे. या फोटोंमध्ये गोयंका हे गौतम गंभीरसोबत चर्चा करताना दिसून येत आहे.

यावेळी गोयंका यांचा राग त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. गंभीर त्यांना समजवण्याचा प्रयत्नही करताना दिसत (Sport News) आहेत. यानंतर नेटकऱ्यांनी गंभीरला चांगलेच ट्रोल केले आहे. व्हायरल फोटोवर यूजर्स म्हणतात की, गंभीरच्या नोकरीवर टांगती तलवार आहे. त्याची कधीही हकालपट्टी होऊ शकते.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs LSG, IPL 2024: लखनऊच्या नवाबांना हैदराबादी दणका! ट्रॅव्हिस हेडने घातला विजयाचा 'अभिषेक'

Uddhav Thackarey: जे अदानी- अंबानींना दिलं ते काढून घेणारं का? उद्धव ठाकरेंचा पीएम मोदींना सवाल

Today's Marathi News Live : मालदीवरून प्रकाश आंबेडकरांचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Maharashtra Politics : शरद पवारांचं एक विधान अन् राजकीय वर्तुळातून प्रतिक्रियांचा पाऊस, कोण काय म्हणालं?

13 लिटरची मोठी इंधन टाकी, स्पोर्टी लूक; Yamaha FZ S Fi दोन नवीन कलर ऑप्शनमध्ये लॉन्च

SCROLL FOR NEXT