weather report saam tv
Sports

IPL 2023 Playoff Scenario: RCB vs GT सामना पावसामुळे रद्द झाल्यास कोण करणार Playoff मध्ये प्रवेश?

RCB VS GT Weather Report: आयपीएल २०२३ स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स संघ आमने सामने येणार आहेत

Ankush Dhavre

IPL 2023 Playoffs: आयपीएल २०२३ स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना गुजरात टायटन्स संघासाठी इतका महत्वाचा नसणार आहे. कारण गुजरात टायटन्स संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.

तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी हा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे. जर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाला प्लेऑफमध्ये प्रवेश करायचा असेल तर, हा सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकावा लागेल.

मात्र या सामन्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची चिंता वाढली आहे. कारण बंगळुरूत पाऊस सुरु आहे. इतकेच नव्हे तर सामना सुरु असताना देखील पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.

जर या सामन्यादरम्यान पाऊस पडला तर दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिला जाईल. असे झाल्यास रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे १५ गुण होतील.

अशा स्थितीत जर मुंबई इंडियन्स संघाने केवळ विजय मिळवला तरी मुंबईचा संघ १६ गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतो. मात्र जर मुंबईचा संघ हैदराबाद विरुद्ध खेळताना पराभूत झाल्यास पाऊस पडूनही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करणार आहे.

गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. तर चौथ्या स्थानासाठी मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स आणि राजस्थान रॉयल्स या ३ संघांमध्ये चुरशीची लढत सुरु आहे.

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाना प्लेऑफमध्ये जाण्याची समान संधी असणार आहे. तर राजस्थान रॉयल्सचा संघ प्लेऑफमध्ये जाणार की नाही हे दोन्ही संघांच्या निकालावर अवलंबून असणार आहे. (Latest sports updates)

अशी असु शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११:

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू:

विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार) , ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरर, अनुज रावत (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल, हर्षल पटेल, वेन पारनेल, शाहबाज अहमद, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज

गुजरात टायटन्स:

शुभमन गिल, ऋद्धिमान साहा(विकेटकीपर), साई सुधारसन, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, दासुन शनाका, राहुल तेवतिया, मोहित शर्मा, राशिद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, यश दयाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar Crime: विश्वास नांगरे पाटील यांच्या IA चेहऱ्याआडून मोठी फसवणूक, सेवानिवृत्त अधिकाऱ्याला ७८ लाखांचा गंडा

Maharashtra Live News Update : मागाठाणे बस डेपोतील कंत्राटी बस चालक संपावर

Gold Rates: सोन्याला चकाकी! भावात वाढ झाली की घसरण? सोनं खरेदीपूर्वी वाचा आजचे लेटस्ट दर

LIC Scheme: LIC ची भन्नाट योजना! फक्त एकदा गुंतवणूक करा अन् आयुष्यभर १ लाखांची पेन्शन मिळवा

Car Tire Pressure: पावसाळ्यात गाडीच्या टायरचा योग्य दाब किती असावा? गाडी चालवताना लक्षात ठेवावयाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT