PBKS vs DC Match Result
PBKS vs DC Match Result IPL/@Twitter
क्रीडा | IPL

PBKS vs DC Match Result: प्रभसिमरनचं शानदार शतक, हरप्रीत ब्रारचा भेदक मारा; पंजाबने दिल्लीला दाखवला घरचा रस्ता

Satish Daud-Patil

PBKS vs DC Match Result: फिरकीपटू हरप्रीत ब्रारचा भेदक मारा, त्याला इतर गोलंदाजांनी दिलेली चांगली साथ आणि युवा खेळाडू प्रभसिमनच्या वादळी शतकाच्या जोरावर पंजाब किंग्जने दिल्ली कॅपिटल्सवर तब्बल ३१ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह पंजाबने प्ले-ऑफच्या शर्यतीत आपली दावेदारी कायम ठेवली, तर दिल्लीचा संघ प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाद झाला आहे.

अरुण जेटली मैदानावर झालेल्या या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना दिल्लीपुढे विजयासाठी १६८ धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ निर्धारित २० षटकात ८ गड्यांच्या मोबदल्यात १३६ धावाच करू शकला. दिल्लीकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक ५४ धावांची खेळी केली. वार्नर वगळता इतर फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आलं. (Latest sports updates)

पंजाबने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाने (IPL 2023) पावरप्लेमध्ये चांगली सुरूवात केली होती. कर्णधार डेव्हिड वॉर्नरने फिल्प सॉल्टच्या साथीने पहिल्या विकेट्साठी ६९ धावा जोडल्या. मात्र, हरप्रीत ब्रारने आधी सॉल्ट आणि त्यापाठोपाठ वॉर्नरला माघारी धाडलं.

दोघेही सलामीवर फलंदाज बाद झाल्यानंतर दिल्लीच्या संघाला गळती लागली. मिचेल मार्श, रिले रूसो, अक्षर पटेल आणि मनिष पांडे आल्या पाऊली माघारी परतले. यातील कोणत्याही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता (Cricket News) आली नाही. हकीम खान आणि प्रवीण दुबेने झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघेही अपयशी ठरले.

त्यामुळे दिल्लीचा संघ निर्धारित २० षटकात ८ गड्यांच्या मोबदल्यात १३६ धावाच करू शकला. पंजाबकडून हरप्रीत ब्रारने भेदक मारा केला. त्याने ४ षटकात ३० धावा देत ४ फलंदाजांना माघारी पाठवलं. याशिवाय नॅथन अॅलिस आणि राहुल चहरने प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या.

तत्पुर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबने निर्धारित २० षटकात ७ गड्यांच्या मोबदल्यात १६७ धावांपर्यंत मजल मारली. पंजाबकडून (Sport Updates) युवा खेळाडू प्रभसिमरनने वादळी शतक ठोकलं. त्याने ६५ चेंडूत १०३ धावा कुटल्या. यामध्ये १० चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. इशांत शर्माने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.

याशिवाय अक्षर पटेल, कुलदीप यादव, प्रवीण दुबे आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली. पंजाबकडून प्रभसिमरन वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नव्हती. मात्र, गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर पंजाबने हा सामना तब्बल ३१ धावांनी आपल्या खिशात घातला.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Rate 29th April 2024: पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल? जाणून घ्या महाराष्ट्रासह राज्यातील आजचे भाव

Narendra Modi: PM मोदींची आज पुण्यात सभा, शहरातील अनेक रस्ते राहणार बंद; वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कोणते?

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जातेय; आम आदमी पक्षाचा गंभीर आरोप

Amit Shah Fake Video: अमित शहांच्या भाषणाचा बनावट व्हिडीओ व्हायरल; भाजप नेते आक्रमक, पोलिसांत गुन्हा दाखल

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, 'या' राशींच्या लोकांसाठी सोमवार ठरणार त्रासदायक; तुमची रास यात नाही ना?

SCROLL FOR NEXT