GT vs SRH Match Result Saam TV
Sports

GT vs SRH Match Result: गुजरातसमोर हैदराबादची बत्ती गुल; पांड्याचा संघ दुसऱ्यांदा Playoff मध्ये, आता‌ समीकरण पार बदललं

GT vs SRH Match Result: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना हैदराबादसमोर विजयासाठी १८९ धावांचं आव्हान ठेवलं होतं.

Satish Daud

GT vs SRH Match Result: वेगवान गोलंदाज मोहमद शमीचा भेदक मारा, त्याला मोहित शर्माने दिलेली चांगली साथ आणि सलामीवीर शुभमन गिलच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने सनराईजर्स हैदराबादवर तब्बल ३४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह गुजरातने प्ले-ऑफच्या फेरीत धडक मारली. तर हैदाबादच्या प्ले-ऑफच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.  (Latest sports updates)

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना हैदराबादसमोर विजयासाठी १८९ धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ निर्धारित २० षटकात ९ गड्यांच्या मोबदल्यात १५४ धावाच करू शकला.

हेनरी क्लासेन आणि भुवनेश्वर कुमार वगळता हैदराबादचा कोणताही फलंदाज गुजरातच्या गोलंदाजांसमोर टिकाव धरू शकला नाही. क्लासेसने चेंडूत धावांची खेळी केली. त्याने चौकार आणि षटकार ठोकले. याशिवाय भुवनेश्वर कुमारने २६ चेंडूत २७ धावांची खेळी केली. गुजरातकडून मोहमद शमी (IPL 2023) आणि मोहित शर्माने प्रत्येकी ४-४ विकेट्स घेतल्या. याशिवाय यश दयालने विकेट्स घेतली.

तत्पुर्वी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या प्रथम फलंदाजीला आलेल्या गुजरातजी आज सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात सलामीवीर ऋद्धिमान साहा शुन्यावर बाद झाला. साहा बाद झाल्यानंतर आलेल्या साई सुदर्शन आणि शुभमन गिलने गुजरातचा डाव सावरला.

दोघांनी पहिल्या विकेटसाठी तब्बल १४७ धावांची पार्टनरशिप केली. मात्र १५ व्या षटकात मार्को जॅनसेनने साई सुदर्शनला बाद करत ही जोडी फोडली. साई सुदर्शन बाद झाल्यानंतर गुजरातच्या संघाला गळतीच लागली. कर्णधार  हार्दिक पांड्याने (Hardik Pandya)  ६ चेंडूत ८ धावांवर बाद झाला. डेव्हिड मिलर ५ चेंडूत ७ धावा करून बाद झाला.

त्यानंतर आलेल्या राहुल तेवतियाने ३ धावा तर दासून शनाकाने ९ धावा केल्या. शेवटच्या षटकात तर गुजरातने ४ विकेट गमावल्या. भुवनेश्वर कुमारने (Sport Updates) शेवटच्या षटकात अवघी एक धाव देत ३ विकेट घेतल्या.

एका बाजूने विकेट्स पडत असताना दुसरीकडे शुभमन गिलने आपले आयपीएलमधील शतक पूर्ण केले. शुभमन गिलने ५८ चेंडूत १०१ धावा कुटल्या. या खेळीत १३ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या.

दरम्यान, या विजयासाह गुजरात टायटन्सने सलग दुसऱ्यांदा (Cricket News)  प्ले-ऑफची फेरी गाठली. आता चेन्नई, मुंबई, आरसीबी आणि लखनौ संघामध्ये प्ले-ऑफची चुरस आणखीच वाढली आहे. या संघांपैकी नेमका कोणते संघ आता प्ले-ऑफची फेरी गाठणार याकडेच क्रिडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT