MI vs CSK Match Updates  Saam TV
Sports

MI vs CSK Match : चेन्नईविरुद्धच्या मॅचपूर्वी मुंबई इंडियन्ससाठी गुड न्यूज; चाहत्यांचा आनंद गगनात मावेना!

CSK vs MI Match : चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्धचा सामना सुरू होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

Satish Daud

MI vs CSK Match Updates : इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या १६ व्या हंगामात आज मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज असा सर्वात मोठा सामना होणार आहे. या सामन्यात नेमकं कोण बाजी मारणार? याकडे क्रिडाप्रेमींचं लक्ष आहे. अशातच सामना सुरू होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. (Latest sports updates)

चेन्नई विरुद्ध मुंबई कोण मारणार बाजी?

यंदाच्या हंगामात  (IPL 2023) पहिल्यांदाच चेन्नई आणि मुंबईचा संघ आमने-सामने येणार आहे. आजचा सामना रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्ससाठी महत्वाचा असणार आहे. कारण, मुंबई पहिल्यांदाच होम ग्राऊंडवर खेळणार आहे. त्यामुळे पहिला सामना गमावल्यानंतर दुसऱ्या सामन्यात चेन्नईला पराभूत करून विजयाच्या आशेने मुंबईचे खेळाडू उतरेल.

दुसरीकडे गुजरात टायटन्सविरुद्ध पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवाला विसरून दुसऱ्या सामन्यात चेन्नईने (Chennai Super Kings) दमदार पुनरागमन केलं. ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवे या चेन्नईच्या दोन धुरंदरांनी केएल राहुलच्या लखनौ सुपर जायंट्सची चांगलीच धुलाई केली होती. हा सामना चेन्नईने १२ धावांनी जिंकला होता. त्यामुळे मुंबईविरुद्धच्या सामन्यात चेन्नईच्या फलंदाजांचा आत्मविश्वास वाढलेला असेल.

मुंबई इंडियन्ससाठी गुड न्यूज काय?

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात आयपीएलमध्ये चांगलाच थरार पाहायला मिळतो. दोन्ही संघ आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत या दोन्ही संघांमध्ये ३६ सामने झाले आहेत. या ३६ सामन्यांपैकी चेन्नईने १५ सामने जिंकले आहेत तर मुंबईने (Mumbai Indians) २१ सामने जिंकले आहेत. पण वानखेडेचे गणित मात्र वेगळेच आहे.

वानखेडेवर मुंबई इंडियन्सचाच डंका

चेन्नईविरोधातील मुंबई इंडियन्सचा आजचा सामना हा वानखेडे स्टेडियमवर म्हणजेच घरच्या मैदानात होणार आहे. या मैदानावर मुंबईचा रेकॉर्ड हा चेन्नईपेक्षा बऱ्याच पटीने चांगला आहे. वानखेडेवर दोन्ही संघामध्ये आतापर्यंत १० सामने खेळवले गेले आहेत. यामधील ७ सामन्यात मुंबईने विजय मिळवला आहे.

तर चेन्नईविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा विजय पक्का

तर केवळ ३ सामन्यात चेन्नई सुपकिंग्जला विजय मिळवता आला आहे. म्हणजेच या मैदानात मुंबईच्या विजयाची टक्केवारी ही ७० टक्के आहे. त्यामुळे मुंबईसाठी हे सर्वात लकी मैदान समजले जात आहे. सामन्यापूर्वी ही आकडेवारी आता समोर आली आहे आणि मुंबईला या लढतीपूर्वी ही आनंदाची बातमी मिळाली आहे. त्यामुळे वानखेडेवर सामना म्हणजे मुंबई इंडियन्ससाठी विजयाची हमी, असे म्हटले जात आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur News : नागपूरच्या १२ वर्षीय जयेशचा मृत्यू नेमका कसा झाला? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

Dada bhuse : शालेय शिक्षण मंत्र्यांची 'दादा' गिरी; बंद पडलेल्या मराठी शाळेत कार्यालय थाटण्याचा प्रस्ताव

Maharashtra Live News Update : राज ठाकरे मीरारोडला जाण्याची शक्यता

kaju katli Recipe: सणासुदींसाठीची खास काजू कतली घरच्याघरी बनवा फक्त २० मिनिटात

Aamir Khan-Gauri Spratt : गौरीसोबत माझं आधीच लग्न झालंय; आमिर खाननं सांगितली तिसऱ्या लग्नाची माहीत नसलेली गोष्ट

SCROLL FOR NEXT