CSK VS GT IPL Match Saam tv
Sports

CSK vs GT IPL Match: ऋतुराज-कॉनवेची धुवांधार फलंदाजी; चेन्नईकडून गुजरातला १७३ धावांचं आव्हान

CSK VS GT IPL Match: प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या चेन्नईने गुजरातला १७३ धावांचं आव्हान दिलं आहे.

Vishal Gangurde

CSK VS GT IPL Match: यपीएल २०२३ स्पर्धेत आज क्वालिफायरचा पहिला सामना रंगत आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत सुरू आहे. गुजरातने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या चेन्नईने गुजरातला १७३ धावांचं आव्हान दिलं आहे. (Latest Marathi News)

प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या चेन्नईच्या (CSK) सलामीवर फलंदाजांनी जोरदार सुरुवात केली. ऋतुराज आणि कॉन्वेने पहिल्या पॉवरप्लेमध्ये धुवांदार फलंदाजी केली. चेन्नईने पहिल्या पॉवरप्लेमध्ये ४९ धावा कुटल्या.चेन्नईला पहिला झटका ऋतुराजच्या रुपाने बसला. मोहित शर्माने तिसऱ्या ऋतुराजला बाद केले. ऋतुराजने ४४ चेंडूत ६० धावा कुटल्या.

चेन्नईला दुसरा धक्का शिवम दुबेच्या रुपाने बसला. दुबेने ३ चेंडूत १ धावा केली. तर दर्शनने चेन्नईला तिसरा धक्का दिला. दर्शनने १५ व्या षटकात अंजिक्यला बाद केले. रहाणेने १० चेंडूत १७ धावा केल्या.

रहाणे बाद झाल्यानंतर कॉन्वे देखील बाद झाला. कॉन्वे ४० धावांवर बाद झाला. पुढे रशिदने अंबातीला देखीत तंबूत परतवले. अंबाती रायडूने ९ चेंडूत १७ कुटल्या. धोनी देखील स्वस्तात माघारी परतला. धोनीने २ चेंडूत केवळ एकच धाव केली. चेन्नईच्या फलंदाजांची मधली फळी ढासळलेली दिसली. चेन्नईने २० षटकात १७२ धावा कुटल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshaye Khanna-Sunny Deol: अक्षय खन्ना आणि सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र; 'बोर्डर'नंतर 'या' चित्रपटात करणार काम

Bhendi Facepack : नैसर्गिक ग्लो मिळवण्यासाठी लावा भेंडीचा फेस पॅक

Relationship Tips: नवरा बायकोचं लग्नानंतर बोलणं कमी झालंय? 'या' टिप्स करा फॉलो, नातं होईल घट्ट

Bhakri Making Tips : भाकरी थापताना तुटते? टेन्शन घेऊ नका, फक्त 'या' सोप्या टिप्स वापरा

लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचं गिफ्ट, 2100 नाहीतर 4500 मिळणार|VIDEO

SCROLL FOR NEXT