आयपीएलचा (IPL 2022) 65 वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद (MI vs SRH) यांच्यात होणार आहे. आयपीएल प्लेऑफच्या (IPL Playoff) शर्यतीतून सर्वात पहिल्यांदा बाहेर पडणार संघ म्हणजे मुंबई तो आता हैद्राबादच्या संघाला बाहेर काढण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. मुंबईच्या संघाचा हा शेवटचा सामना आहे. त्यामुळे मुंबई हंगामाची हॅप्पी एंडिंग करण्यासाठी मैदानावर उतरेल.
हैदराबादला विजय आवश्यक...
IPL 2022 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाद झालेला मुंबई इंडियन्स हा पहिला संघ होता. 5 वेळा आयपीएलचा हंगामा आपल्या नावावर करणाऱ्या मुबईची अवस्था यंदाच्या हंगामात जखमी सिंगासारखी झाली होती. रोहित शर्माच्या कप्तानीचा जोर यंदाच्या हंगामात पाहयला मिळाला नाही. आजच्या सामन्यात हैद्राबादच्या संघाला विजय आवश्यक आहे कारण आज जर हैद्राबाद सामना हारला तर तोही या हंगामातून बाहेर पडू शकतो.
सनरायझर्स हैदराबादने सुरुवातीला चांगली कामगिरी केली, पण गेल्या काही सामन्यांतील सलग पराभवानंतर संघाची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता नगण्य आहे. तरीही हैदराबादला प्लेऑफच्या शर्यतीत टिकायचे असेल, तर आगामी दोन्ही सामने तरी जिंकावे लागणार आहेत. तरीही प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शाश्वती नसली तरी विजय आवश्यक आहे. मंगळवारी मुंबई इंडियन्सकडून हा संघ पराभूत झाल्यास प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा हा तिसरा संघ ठरेल.
संभाव्य संघ
मुंबई इंडियन्स
इशान किशन, रोहित शर्मा (कर्णधार), डॅनियल सॅम्स, तिलक वर्मा, ट्रिस्टन स्टब्स, हृतिक शोकीन, टिम डेव्हिड, रमणदीप सिंग, जसप्रीत बुमराह, रिले मेरेडिथ, कुमार कार्तिक
सनरायझर्स हैदराबाद
केन विल्यमसन (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन, वॉशिंग्टन सुंदर, शशांक सिंग, मार्को यानसेन, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, टी नटराजन
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.