Rohit Sharma  Saam Tv
Sports

रोहितचा एक षटकार आणि गेंड्यांना मिळालं 5 लाखांचं गिफ्ट; पाहा झाले तरी काय?

IPL 2022 : रोहित शर्माने अलझारी जोसेफच्या चेंडूवर षटकार लगावताना प्रायोजकांनी मैदानात ठेवलेल्या टाटा पंच कारची काच फोडली

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : आयपीएल 2022 स्पर्धेत (IPL 2022) शुक्रवारी रोहित शर्माच्या (Rohit Sharma) मुंबई इंडियन्सचा सामना हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) गुजरात टायटन्स संघासोबत झाला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या थरारक सामन्यात मुंबईने गुजरातवर (MI vs GT) 5 धावांनी विजय मिळवला. यंदाच्या आयपीएल हंगामात मुंबई संघाचा हा सलग दुसरा विजय ठरला. मुंबईच्या चाहत्यांसाठी दिलासा देणारी बाब म्हणजे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा यंदाच्या मौसमात पहिल्यांदा फॉर्ममध्ये दिसला. रोहिने सलामीला येताना 28 चेंडूत 43 धावांची खेळी केली. इतकंच नाही तर, रोहितच्या षटकाराने लीगच्या प्रायोजक टाटा पंच कारची काचही फोडली. रोहितचा हाच फटका काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला 5 लाख रुपये देऊन गेला.

तसं पाहता आतापर्यंत रोहित शर्माची बॅट यंदाच्या आयपीएल हंगामात शांतच होती. रोहितच्या खराब फॉर्मचा फटकाही संघाला सहन करावा लागला. आयपीएलमध्ये पाचवेळा विजेतेपद पटकवणारा मुंबईचा संघ यंदाच्या प्ले-ऑफ शर्यतीतून बाहेर पडला. सुरूवातीचे सलग 8 सामने गमावल्यानंतर राजस्थानविरुद्धच्या सामन्यात मुंबईला विजयाची चव चाखायला मिळाली. त्यानंतर मुंबई संघाने शुक्रवारी गुजरात टायटन्सला पराभूत केले. यंदाच्या हंगामात हा त्यांचा सलग दुसरा विजय ठरला.

या सामन्यांत रोहित शर्माच्या एका फटक्याने चांगले कामही केले. रोहित शर्माने अलझारी जोसेफच्या चेंडूवर षटकार लगावताना प्रायोजकांनी मैदानात ठेवलेल्या टाटा पंच कारची काच फोडली. त्याच्या या फटक्याने 5 लाखांची कमाई झाली. पण, वास्ताविक हे 5 लाख रुपये रोहितला मिळाले नाही. टाटा हे आयपीएलचे अधिकृत प्रायोजक आहेत. टाटांनी अशी घोषणा केली होती की जर एखाद्या फलंदाजाने सीमारेषेबाहेर असलेल्या पंच कारवर चेंडू मारला तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला (Kaziranga National Park) 5 लाख रुपये टाटांकडून दिले जातील. हे राष्ट्रीय उद्यान एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. रोहितने मारलेला चेंडू टाटा पंच वर जाऊन लागला आणि त्यामुळेच काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला 5 लाख रुपये मिळाले

दरम्यान, शुक्रवारी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या सामन्यात गुजरातने प्रथम मुंबईला फलंदाजीला पाचारण केले. मुंबईने गुजरात टायटन्ससमोर 177 धावांचे आव्हान ठेवले. मुंबईकडून इशान किशनने सर्वाधिक 45 धावांची खेळी केली. रोहित शर्माने देखील आक्रमक सुरूवात करत 43 धावांची खेळी केली. तर टीम डेव्हिडने देखील तिलर वर्मासोबत भागीदारी रचत मुंबईला 150 च्या पार पोहचवले. त्याने 21 चेंडूत नाबाद 44 धावांची खेळी केली. यामुळे मुंबईला 177 धावांपर्यंत मजल मारता आली.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bajra Dhapate Recipe : नाश्त्याला काय? फक्त १० मिनिटांत बनवा खमंग - पौष्टिक बाजरीचे धपाटे

Maharashtra Live News Update: काँग्रेस वंचित बहुजन आघाडीशी युती करणार

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; अमृतांजन पुलाच्या खांबाला धडकून ट्रकचा चक्काचूर, केबिनमध्ये अडकला ड्रायव्हरचा मृतदेह

Tata Sierra: टाटा सिएरासाठी विक्रमी मागणी, पहिल्या दिवशी ७०,०००पेक्षा जास्त ऑर्डर्स, वाचा खास वैशिष्ट्ये

Dhananjay Munde: मंत्रीपदासाठी फिल्डिंग; इकडे कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार, तिकडे धनंजय मुंडेंची दिल्लीवारी

SCROLL FOR NEXT