Harshal Patel Saam TV
Sports

सामना सुरु असतानाच हर्षल पटेलला आली वाईट बातमी, तडकाफडकी सोडला संघ

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यातही त्याने 2 बळी घेत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

वृत्तसंस्था

आयपीएल 2022 मध्ये खेळणारा आरसीबीचा खेळाडू हर्षल पटेलच्या (Harshal Patel) बहिणीचे निधन झाले आहे. ९ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) सामना खेळत असतानाच त्याच्या बहिणीचा मृत्यू झाला. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, सामना संपल्यानंतर हर्षल एका दिवसासाठी घरी परतला आहे. आता तो 12 एप्रिलला CSK विरुद्धच्या सामन्यापूर्वी संघात सामील होण्याची शक्यता आहे . मात्र, तो सामील झाल्यावर क्वारंटाइन यंत्रणा काय असेल, हे सध्या स्पष्ट झालेले नाही. हर्षल पटेल गेल्या दोन वर्षांपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार परफॉर्मर आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यातही त्याने 2 बळी घेत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

आता संघात कधी सामील होणार...

आयपीएलशी संबंधित सूत्रांनी पीटीआयला सांगितले की, "हर्षल अचानक बायो बबलमधून बाहेर पडणे दुर्दैवी आहे. कारण त्यांच्या कुटुंबामध्ये दु:खद घटना घडली आहे. 12 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यापूर्वी हर्षल आता संघाच्या बायोबबलमध्ये सामील होण्याची शक्यता आहे."हर्षलच्या कुटुंबातील कोणाचा तरी मृत्यू झाला हे पीटीआयने स्पष्ट केलेले नाही. मात्र दैनिक जागरणच्या वृत्तानुसार हर्षल पटेलच्या बहिणीचा मृत्यू झाला आहे असे सांगण्यात आले आहे.

आरसीबीच्या कामगिरीत हर्षल पटेलचा मोठा वाटा

आयपीएल 2022 मध्ये, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत, त्यापैकी 3 सामने जिंकले आहेत आणि एक सामना गमावला आहे. रॉयल चॅलेंजर्सच्या कामगिरीत हर्षल पटेलचा मोठा वाटा आहे. गेल्या मोसमात पर्पल कॅप जिंकणारा तो गोलंदाजही होता. आरसीबीला मंगळवारी चेन्नई सुपर किंग्जसोबत सामना खेळायचा आहे. हर्षल पटेल या सामन्यापूर्वी सामील होईल पण त्यात खेळू शकेल की नाही. सध्या काही सांगता येणार नाही.

हर्षल पटेलने आतापर्यंत आयपीएलमध्ये 67 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 22.57 च्या सरासरीने 84 विकेट्स घेतल्या आहेत. या कालावधीत त्याने 30 डावांत फलंदाजीही केली आहे. आणि 206 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 36 धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग होण्यापूर्वी हर्षल पटेल दिल्ली कॅपिटल्समध्ये होता. आरसीबीने त्याला दिल्लीकडून विकत घेतले होते.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Tv Exit Poll: नवी मुंबईमध्ये गणेश नाईक नडले पण आणि जिंकणे पण...!

भाजपची लाट! २९ महापालिकांवर झेंडा, शिंदे-पवारांची गरज कुठे? ठाकरे बंधूंना किती जागा? पाहा महा एक्झिट पोलचा अंदाज

Trendy Kurta Desing: कॅज्युअल आणि ऑफिस वेअरसाठी ट्राय करा 'हे' सुंदर ट्रेंडी कुर्ता

Saam Tv Exit Poll: मुंबई ठाकरेंच्या हातून जाणार, एक्झिट पोलचा अंदाज, पाहा महायुतीला किती मिळणार जागा?

Municipal Elections Voting Live updates : सोलापुरात मतदानच्या शेवटच्या वेळी दोन गटात भांडण

SCROLL FOR NEXT