Ravi Shashtri- Virat Kohli Saam TV
क्रीडा

विराट कोहली पकलाय त्याला विश्रांतीची गरज; रवी शास्त्रींचा सल्ला

विराट कोहली आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये फॉर्म अतिशय खराब सुरु आहे.

Pravin

विराट कोहली आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये फॉर्म अतिशय खराब सुरु आहे. 19 एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात त्याला खातेही उघडता आले नव्हते. दरम्यान, टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराट कोहलीला (Virat Kohli) काही काळ विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की बायो बबलच्या निर्बंधांदरम्यान, खेळाडूंची काळजी घेतली पाहिजे. रवी शास्त्री (Ravi Shashtri) म्हणाले की विराट कोहलीचे अजून सहा-सात वर्षांचे क्रिकेट बाकी आहे आणि त्यामुळे त्याच्यावर जास्त जोर टाकून फायदा नाहीये. भारताच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी कोहलीला विश्रांती देण्यात यावी, असे ते म्हणाले. सततच्या टीका आणि अपेक्षांच्या ओझ्याने तो थकला आहे.

रवी शास्त्री यांनी स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना सांगितले की, 'मी प्रशिक्षक असताना हे सर्व सुरू झाले. तुम्हाला खेळाडूंबद्दल सहानुभूती असायला हवी, हे मी पहिल्यांदा म्हणालो होते. जर तुम्ही आग्रह धरला तर, खेळाडूने हार मानतो किंवा आश्चर्यकारक कामगिरी करतो. त्यामुळे तुम्हाला खूप समज दाखवावी लागते.

'कोहलीला विश्रांतीची गरज'

विराट कोहलीचा संदर्भ देत ते म्हणाले, विराट कोहली पकला आहे. जर कोणाला विश्रांतीची गरज असेल तर तो कोहली आहे. दोन महिने असो किंवा दीड महिना, इंग्लंड दौऱ्यापूर्वी असो वा नंतर, त्याला ब्रेक मिळायला हवा. त्यांला विश्रांतीची गरज आहे कारण त्याच्यात अजून सहा-सात वर्षांचे क्रिकेट बाकी आहे . तो एकटा नाही. सध्या जागतिक क्रिकेटमध्ये अशी एक-दोन नावे असू शकतात. तुम्हाला समस्येचा सामना करावा लागेल.

आयपीएल 2022 सुरू होण्यापूर्वी विराट कोहलीकडून खूप अपेक्षा होत्या. त्याने आरसीबी आणि टीम इंडियाचे कर्णधारपद सोडले आहे पण त्यामुळे त्याच्या खेळात काही विशेष फरक दिसून आला नाही. त्याला या मोसमात सात सामन्यांत 19.83 च्या माफक सरासरीने 119 धावा करता आल्या आहेत.

पीटरसन म्हणाला - सोशल मीडिया थांबवा अन्...

इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसननेही विराट कोहलीच्या मुद्द्यावर रवी शास्त्री यांच्याशी सहमती दर्शवली. कोहलीने या वेळेचा उपयोग सोशल मीडियापासून अंतर ठेवून खेळ सुधारण्यासाठी करायला हवा, असे तो म्हणाला. ब्रेकनंतर विराट कोहली आल्यावर टीम इंडियाने त्याला संघात स्थान द्यायला हवं, असं पीटरसन म्हणाला.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips : घराची तोडफोड न करताही दूर होऊ शकतो वास्तूदोष, जाणून घ्या सोपे उपाय

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातील २१ विधानसभा मतदारासंघाचा निकाल पाहा एका क्लिकवर

Maharashtra Election Result : बविआचा बालेकिल्ल्यातच भाजपकडून सुपडासाफ; हितेंद्र ठाकूर-क्षितीज ठाकूर पराभूत

Railway Mega Block : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी मेगा ब्लॉक; लोकल, एक्सप्रेस गाड्या धावणार उशिराने

Kolhapur Assembly Election: कोल्हापूरकरांनी आर्शीवादाचा 'हात' काढला, महायुतीला १० पैकी १० जागांवर साथ, मविआला धक्का

SCROLL FOR NEXT