Rohit Sharma
Rohit Sharma Saam Tv
क्रीडा | IPL

“आम्ही असेच खेळतो”; पहिल्या विजयानंतर रोहित शर्माची प्रतिक्रिया

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या (IPL 2022) हंगामात अखेर मुंबईने राजस्थानचा (MI vs RR) पराभव करत विजयाचा श्रीगणेशा केला. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) अर्धशतकाच्या बळावर मुंबईने राजस्थानचा पाच गड्यांनी पराभव केला. राजस्थान रॉयलने (Rajastan Royals) दिलेले १५९ धावांचे आव्हान मुंबईने पाच गड्यांच्या मोबदल्यात पार केले. या विजयासह मुंबईच्या (Mumbai Indians) संघाने गुणतालिकेत आपलं खातं उघडलं. विजय मिळाल्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, “आम्ही असेच खेळतो, आमच्या खेळाडूंमध्येही अशीच क्षमता आहे"

पाचवेळा विजेतेपदाचा मान पटकाविणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाची यंदाच्या हंगामात खराब सुरूवात झाली. सलग ८ सामने गमावल्यानंतर नवव्या सामन्यात मुंबईला विजयाची चव चाखायला मिळाली. मात्र, हा विजय मिळवला असला तरी, मुंबईचा प्ले ऑफमध्ये जाणाचा मार्ग याआधीच बंद झाला आहे. मात्र, या विजयामुळे मुंबई संघाचं मनोबल नक्कीच उंचावेल. सध्या गुणतालिकेत मुंबईचा संघ १ विजय आणि ८ पराभवासह १० व्या क्रमांकावर आहे.

विजयाचा श्रीगणेशा केल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने हटके प्रतिक्रिया दिली. रोहित म्हणाला की, “आम्ही असेच खेळतो. आमच्या खेळाडूंमध्येही अशीच क्षमता आहे. आम्हाला माहित होते की येथे फलंदाजी करणे सोपे नाही पण आमच्या संघात ज्या प्रकारचे फलंदाज आहेत ते आमच्या बाजूने सामना फिरवू शकतात. आम्ही याच संघापासून सुरुवात केली असती, तर गोलंदाजीत काही बदल झाले असते. आम्ही ज्या संघासोबत खेळत होतो तो अशा खेळपट्टीवर खूप चांगला ठरला आहे".

दरम्यान, शनिवारी झालेल्या राजस्थानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या राजस्थान रॉयल्सची सुरुवात निराशाजनक झाली. देवदत्त पडिक्कल (१५) याला पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यास अपयश आले. पडिक्कलनंतर कर्णधार संजू सॅमसनही माघारी परतला. संजू सॅमसनला फक्त १६ धावा करता आल्या. जॉश बटलरने एकाकी झुंज देत संघाला १५८ अशी सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. १५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला चांगली सुरुवात करता आली नाही. मात्र तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेल्या सूर्यकुमार यादवने शानदार फलंदाजी केली. मुंबईने हा सामना पाच विकेटने जिंकला.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sara Tendulkar चा वेस्टर्न आऊटफिटमध्ये हटके अंदाज

Today's Marathi News Live : मी देखील विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात पावलं उचलणार; उज्वल निकम

Sharad Pawar : जरा जपून, सरळ करायला वेळ लागणार नाही; शरद पवारांनी भर सभेत भरला आमदाराला दम

Ruchira Jadhav : मराठमोळा लूक अन् दाक्षिणात्य अंदाज, रुचिरा जाधवचं सुंदर फोटोशूट

Beed News: ताई तुम्ही रस्ता दिला, आता गाडीही द्या; महिलेची मागणी ऐकताच पंकजा मुंडेंनी थेट फोनच लावला

SCROLL FOR NEXT