Rohit Sharma  Saam TV
Sports

रोहितच्या पदरी आणखी एक निराशा; हंगाम सुरु झाल्यापासून भरला 36 लाखांचा दंड!

मुंबईच्या संघाने पाच सामने गमावल्यानंतर मुंबईचे चाहते नाराजा आहेत.

वृत्तसंस्था

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि प्लेइंग इलेव्हनच्या इतर सदस्यांना इंडियन प्रीमियर लीगमधील पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला आहे. काल झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जने 12 धावांनी सामना जिंकला. आयपीएलने एका निवेदनात म्हटले आहे की, “13 एप्रिल रोजी पुण्यातील एमसीए स्टेडियमवर पंजाब किंग्ज विरुद्धच्या आयपीएल सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला आहे.

मुंबईच्या संघाने पाच सामने गमावल्यानंतर मुंबईचे चाहते नाराजा आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या संघाला आपला खेळ दाखवता आलेला नाही. त्यामुळे प्लेऑफमध्ये मुंबई जाणार की त्या अगोदरच बाहेर पडणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पाचवेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सने पराभवाची मालिका सुरुच आहे. पंजाब किंग्जविरुद्ध त्यांचा सलग पाचवा पराभव झाला. त्यानुसार, "आयपीएलच्या किमान ओव्हर-रेटच्या उल्लंघनाअंतर्गत संघाची या हंगामातील ही दुसरी घटना आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला 24 लाख रुपये तर प्लेइंग इलेव्हनच्या इतर सदस्यांना 6 लाख रुपये किंवा त्यांच्या मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे," असे निवेदनात म्हटले आहे. यापूर्वी रोहितला दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates: एनडीएने बहुमताचा आकडा ओलांडला, कोण किती जागांवर आघाडीवर?

Maharashtra Live News Update: नवले ब्रीज अपघात प्रकरणी गुन्हा दाखल, तिघांवर गुन्हा दाखल

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेला फिरकीच्या जाळ्यात गुंडाळणार; टीम इंडिया मैदानावर उतरवणार ४ हुकुमी एक्के

शिवसेना ठाकरे गटाच्या खासदाराच्या घरातच फूट; काकांनी सोडली साथ, नाशिकमध्ये भाजपची ताकद वाढली

8th Pay Commission : आठवा वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट, २०२९ लोकसभेआधी कर्मचार्‍यांचा पगार वाढणार; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT