IPL 2022 Mega Auction: आयपीएलने अनेक खेळाडूंचे भविष्य घडवले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी आयपीएल एक माध्यम समजले जाते. यंदाच्या लिलावात अनेक नवख्या खेळाडूंवर फँचायझींनी मोठी बोली लावली (IPL 2022 Mega Auction) आहे. तर अनेक दिग्गज खेळाजू अनसोल्ड राहिले आहेत. आयपीएलने अनेक खेळाडूंना अंधारातून बाहेर काढून प्रसिद्धी मिळवून दिली आहे. त्यात अनेक नावे आहेत आणि दरवर्षी अशा नावांची यादी वाढत जाते. यावेळीही एक खेळाडू सर्वांच्या नजरेसमोर आला आहे. तो खेळाडू म्हणजे टिलक वर्मा (Tilak Varma).
आयपीएल मेगा लिलावाच्या दुस-या दिवशी टिलकचे नाव सर्वांसमोर आले. तेव्हा त्याला आपल्या संघात घेण्यासाठी संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. त्यानंतर मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) त्याला आपल्या गोटात सामिल करुन घेतले. टिलकचे वडील इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतात, त्याच्या वडीलांकडे मुलाच्या क्रिकेटच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. मग त्याच्या सर्व खर्चाची जबाबदारी उचलली ती त्याच्या प्रशिक्षकाने.
तिलक एकेकाळी हैद्राबादच्या रस्त्यांवर कट, पुल सारखे आकर्षक फटके मारुन सर्वांना आकर्षीत करायचा. आता आयपीएलच्या यंदाच्या हंगामामध्ये त्याला मुंबई इंडियन्सने आपल्या संघात घेवून 'करोडपती' बनवले आहे. मुंबईच्या संघाने त्याला १.७ कोटी रुपयांत आपल्या संघात घेतले आहे. तिलकसाठी चेन्नई, राजस्थान रॉयल संघाने बोली लावली होती.
यशाचे श्रेय दिले प्रशिक्षकाला...
या तरुण खेळाडूने या टप्प्यावर पोहोचण्याचे श्रेय आपल्या प्रशिक्षकाला दिले आहे. सलाम बायश असे त्यांचे नाव. ज्यांनी त्याला आवश्यक कोचिंग, क्रिकेट साहित्य, जेवण वेळ पडली तर घरी राहण्यासाठी जागाही दिली. वर्माचे वडील नंबुरी नागराजू आपल्या मुलाला क्रिकेट अकादमीत पाठवायला तयार नव्हते. यावेळी त्यांनी त्याचा संपुर्ण खर्च उचलला, त्यामुळेच तो आज या टप्प्यावर पोहोचला आहे. तिलक वर्माने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, तुम्ही माझ्याबद्दल लिहीत नसले तरी माझ्या प्रशिक्षक सरांचा उल्लेख जरूर करा. त्यांनी मला क्रिकेटचे साहित्य दिले आणि माझ्या अनेक खर्चाची जबाबदारी घेतली. म्हणूनच मी जो काही आहे, त्यांच्यामुळेच आहे आणि माझे कुटुंबही यात सामिल आहेत.
कोरोना काळात केली मदत
टिलक वर्माच्या कुटुंबात चार सदस्य असून ते भाड्याच्या घरात राहतात. कोविडमुळे लॉकडाऊन पडला तेव्हा त्याच्या कुटुंबाला खूप त्रास सहन करावा लागला पण त्याच्या प्रशिक्षकाने त्याला साथ दिल्याने त्याच्या क्रिकेटवर कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही.
ते म्हणाले, “अनेक प्रकारच्या समस्या येत होत्या आणि महामारीमुळे आम्हाला आमचा खर्चही कमी करावा लागला. पण माझे प्रशिक्षक मला क्रिकेट खेळवत राहिले. आशा आहे की आता गोष्टी चांगल्या होतील."
एवढी मोठी बोली लागेल अशी अपेक्षा नव्हती
टिलक सध्या हैदराबाद रणजी संघासोबत कटकमध्ये आहे. इतके पैसे मिळतील अशी अपेक्षाही टिलकला कधी नव्हती. टिळक म्हणाला, “मला विश्वास होता की मी आयपीएल खेळेन पण इतके पैसे मिळतील असे वाटले नव्हते. मला सर्वात जास्त आवडत असलेल्या संघासोबत खेळणे हे एक स्वप्न पूर्ण झाले आहे. यामुळे मला महान खेळाडूंसोबत खेळण्याची आणि माझ्या खेळात सुधारणा करण्याची संधी मिळेल.”
टिळकांनी तीन वर्षांपूर्वी रणजी करंडक क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि 2020 मध्ये भारताच्या अंडर-19 संघाचा भाग होता. हा संघ अंतिम फेरीत पोहोचला पण विजय मिळवू शकला नाही. त्याने दोन सामने खेळले आणि 38, 48 धावा केल्या.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.