Shahrukh Khan Saam TV
Sports

तीन संघांचा डोळा त्या 'शाहरुख'वर, करोडो द्यायलाही तयार; कोण आहे तो दिग्गज?

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात महत्त्वाचा रोल असतो तो फिनिशरचा.

वृत्तसंस्था

भारतातील आणि जगभरातील क्रिकेट चाहते आयपीएलची आतुरतेने वाट पाहत आहेत. आयपीएलमध्ये चाहत्यांसाठी पर्वणी असते. १५ व्या हंगामाचा लिलाव आता अवघ्या चार दिवसांवर आला आहे. त्यामुळे फँचायझी कोणता खेळाडू आपल्या संघात घ्यायचा याची तयारी करु लागल्या आहेत. १२-१३ फेब्रुवारीला यंदाच्या हंगामाचा मेगा लिलाव बेंगरोलमध्ये होणार आहे. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात महत्त्वाचा रोल असतो तो फिनिशरचा. आणि सध्या अनेक खेळाडू बेस्ट फिनिशरच्या श्रेणीत आहेत. असाच एक खेळाडू आहे ज्याला जवळपास ३ फँचायझी आपल्या संघात घेण्यासाठी तयार आहे.

त्याच्यावर मोठी बोली लावली जाऊ शकते. शाहरुख खान हा सध्या तामीळनाडूच्या संघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो. मागच्या हंगामात त्याला पंजाब किंग्सच्या संघाने ५.२५ कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्याले ११ सामन्यामंध्ये १३४.२१ च्या स्ट्राईक रेटने १५३ धावा केल्या होत्या. मागच्या त्याच्या खेळावर जर नजर टाकली तर त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांनाच प्रभावीत केले आहे. नुकत्याच झालेल्या मुश्ताक अली ट्राफी आणि विजय हजारे ट्राफीमध्ये त्याने आपल्या खेळाची चमक दाखवली आहे. यंदाच्या हंगामात त्याची बेस प्राईस ४० लाख रुपये आहे. खालील तीन फँचायझी त्यावर लावतील करोडोची बोली.

चेन्नई सुपर किंग्स (CSK)

चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला संघात सध्या एक चांगला यंग फिनिशर पाहिजे. संघाने अनेक सामने हे फिनिशर अभावी गमावले आहेत. धोनीच्या नेतृत्वात नेहमीच तरुण खेळाडू घडत असतात. धोनी शाहरुखला संघात घेवून भारतीय संघाच्या हिशोबाने त्याला तयार करेल, आणि चेन्नईच्या संघालाही त्याचा फायदा होईल. शाहरुख हा हार्ड हिटर म्हणूनही ओळखला जातो. त्याचबरोबर तो वेळे प्रसंगी गोलंदाजीही करु शकतो. त्यामुळे त्याला संघात घेण्यासाठी धोनी आग्रही असेल.

राजस्थान रॉयल (RR)

युवा कर्णधार संजू सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थानचा संघ मागच्या हंगामात खेळला होता. आणि यंदाच्या हंगामातही तोच कर्णधार असणार आहे. २००८ मध्ये राजस्थानच्या संघाने आयपीएलचं विजेतेपद पटकावलं होते. सध्या संघाकडे संजू सॅमसन, जॉस बटलर, यशस्वी जयस्वाल सारखे खेळाडू आहेत. त्यामुळे संघ मधली फळी आणि फिनिशर म्हणून शाहरुख खानला संघात घेवू शकतो.

रॉयल चॅलेंजर बेंगलोर (RCB)

यंदाच्या हंगामात आरसीबीचा संघ नव्या कर्णधारासोबत मैदानात उतरणार आहे. संघाचा विस्पोटक फलंदाज एबी डिवीलीअर्सने निवृत्त घेतली आहे. त्यामुळे संघाला मधली फळी मजबूत करावी लागणार आहे. त्यासाठी एबीची जागा शाहरुख घेवू शकतो. मधली फळी भक्कम करण्यासाठी आरसीबीकडे अनेक पर्याय आहेत.त्यातला सर्वोत्तम पर्याय आहे शाहरुख खानचा. त्यामुळे आरसीबीचा संघही त्याला करोडो रुपयांत विकत घेवू शकतो.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajyog 2025: गजकेसरी आणि कलात्मक राजयोगामुळे फळफळणार 'या' राशींचं नशीब; उत्पन्नाचे नवे मार्ग होणार खुले

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

Pregnancy Tips : गर्भावस्थेतील मधुमेह नियंत्रणात ठेवणे का आवश्यक आहे?

Pandharpur: डॉल्बीच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू, दंहीहंडीचा कार्यक्रम पाहायला आला अन्...; पंढरपुरात खळबळ

Hair Loss Remedie : टक्कल पडण्याची समस्या? हे घरगुती उपाय करतील मदत

SCROLL FOR NEXT