IPL 2022- CSK Saam TV
Sports

IPL 2022: इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईच्या संघानं केला खराब विक्रम...

अगदी लिगच्या तोंडावर धोनीने कर्णधार पद सोडले आणि ते रविंज्र जाडेजाकडे आले होते.

वृत्तसंस्था

आयपीएलच्या (IPL 2022) १५व्या हंगामातील ११ वा सामना रविवारी मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडियमवरती वरती खेळवला गेला. चेन्नई सुपर किंग्स समोर पंजाब किंग्सचे (CSK vs PBKS) आव्हान होते. चेन्नईचा कर्णधार रविंद्र जडेजाने टॉस जिंकूम प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबच्या संघाने १८० धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईच्या संघाने १२६ धावाच केल्या. पंजाबने ५४ धावांनी हा सामना जिंकला. यंदाचा हंगामातील चेन्नईची ही तिसरी हार आहे. शानदार कामगिरीसाठी लियाम लिविंगस्टोनला सामनाविराचा किताब देण्यात आला. चेन्नईच्या संघाने आयपीएलच्या इतिहासातील आपला रेकॉर्ड बनवला आहे. आयपीएल जेव्हापासून सुरु झाली तेव्हापासून पहिल्यांदाच चेन्नई सलग तीन सामने हारली आहेत. चेन्नईने आतापर्तंय ३ वेळा आयपीएल जिंकली आहे. अगदी लिगच्या तोंडावर धोनीने कर्णधार पद सोडले आणि ते रविंज्र जाडेजाकडे आले होते.

नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीला आलेल्या पंजाबची सुरुवात खराब झाली. कर्णधार मयांक अग्रवाल पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ४ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. दुसरीकडे भानुका राजपक्षेनेही दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर आपली विकेट गमावली. यानंतर लियाम लिव्हिंगस्टोनने शिखर धवनसह डावाची धुरा सांभाळली. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी झाली. १०व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर धवन ३३ धावांवर बाद झाला. ११व्या षटकात लियाम लिव्हिंगस्टोन ३२ चेंडूत ६० धावा करून बाद झाला. यानंतर जितेश शर्माने २६, शाहरुख खानने ६, ओडियन स्मिथने ३ आणि राहुल चहरने १२ धावा केल्या. कागिसो रबाडा १२ आणि वैभव अरोरा १ धावावर नाबाद राहिले. चेन्नईकडून ख्रिस जॉर्डन, ड्वेन प्रिटोरियस यांनी २-२ तर ड्वेन ब्राव्हो, मुकेश चौधरी आणि रवींद्र जडेजा यांनी १-१ बळी घेतला.

१८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली. गेल्या दोन सामन्यांमध्ये निराशाजनक कामगिरी करणारा ऋतुराज गायकवाड या सामन्यातही फ्लॉप ठरला. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तो १ धाव घेत पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर रॉबिन उथप्पाने १३, मोईन अलीने ०, अंबाती रायडूने १३, कर्णधार रवींद्र जडेजाने ०, शिवम दुबेने ५७, धोनीने २३, ब्राव्होने ०, ड्वेन प्रिटोरियसने ८, ख्रिस जॉर्डनने ५ धावा केल्या. तर मुकेश चौधरी २ धावांवर नाबाद राहिला. पंजाबकडून राहुल चहर ३, लियाम लिव्हिंगस्टोन आणि वैभव अरोरा यांनी २-२, ओडियन स्मिथ, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा यांनी १-१ बळी घेतले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray And Uddhav Thackeray: राज आणि उद्धव ठाकरे यांचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो

Maharashtra Marathi Bhasha: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा जल्लोष मुंबई लोकलमध्येही|VIDEO

Marathi bhasha Vijay Live Updates : राज ठाकरे-उद्धव ठाकरे मेळाव्यासाठी रवाना, थोड्याच वेळात तोफ धडाडणार

Raj-Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे याआधी एकाच मंचावर कधी आणि कुठे आले होते?

Sushil Kedia: राज ठाकरेंना धमकी देणं पडलं महागात, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT