IPL 2022 Saam Tv
क्रीडा

IPL 2022: टाटा पंच कार मिळाली तरी कोणाला?

गुजरात टायटन्सने ट्राफीवर आपले नाव कोरले.

साम वृत्तसंथा

मुंबई: काल आयपीएलच्या (IPL 2022 ) १५ व्या हंगामातील अंतिम सामना झाला. गुजरात टायटन्स विरुध्द राजस्थान रॉयल्स रंगतदार झाला. गुजरात टायटन्सने ट्राफीवर आपले नाव कोरले. गुजराने ७ गडी राखून राजस्थान रॉयल्सचा पराभव करत अंतिम सामना जिंकला. विजेत्या तसेच उपविजेत्या संघावर बक्षिसांचा पाऊस पडला. स्टेडियममध्ये उभी असेलेली टाटा पंच कारवर कोण नाव कोरणार याच्या चर्चा रंगल्या होत्या.

दिनेश कार्तिक हा आयपीएल २०२२ (IPL 2022 ) मध्ये आरसीबी संघातकडून खेळला. या हंगामात दिनेश कार्तिकने चांगली खेळी केली. दिनेश कार्तिकने या हंगामात आरसीबीसाठी फिनिशरची भूमिका बजावली. त्याने मिळालेल्या संधीच सोनं केल. या कामगिरीमुळे त्याची आयपीएल 2022 मध्ये सीझनचा सर्वोत्कृष्ट स्ट्रायकर म्हणून निवड झाली. दिनेशला टाटा पंच कार बक्षीस म्हणून मिळाली.

दिनेश कार्तिकने या हंगामात आरसीबीसाठी १६ सामन्यांमध्ये ५५.०० च्या सरासरीने आणि १८३.३३ च्या स्ट्राइक रेटने ३३० धावा केल्या. दिनेश या हंगामात १० वेळा नाबाद राहिला आहे. या हंगामात आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचली, पण क्वालिफायर २ मध्ये त्यांना राजस्थानकडून पराभव पत्करावा लागला. या हंगामात टाटा पंच कारवर दिनेश कार्तिकने आपले नाव कोरले.

कोणाला किती बक्षीस मिळाले

पंच स्ट्रायकर ऑफ द मॅच - डेव्हिड मिलर- १ लाख रुपये

पॉवरप्लेअर ऑफ द मॅच - ट्रेंट बोल्ट- १ लाख रुपये

मोस्ट वेल्युएबल ऐसेट ऑफ द मॅच - हार्दिक पंड्या- १ लाख रुपये

लेट्स क्रॅक इट सिक्स अवॉर्ड - यशस्वी जैस्वाल- १ लाख रुपये

गेमचेंजर ऑफ द मॅच- हार्दिक पंड्या- १ लाख रुपये

फास्टेस्ट डिलीवरी ऑफ द मॅच- लॉकी फॉर्युसन - १ लाख रुपये

रुपे ऑन गो द मॅच- जोस बटलर- १ लाख रुपये

सामनावीर - हार्दिक पंड्या- ५ लाख रुपये

या सामन्यात सर्वात जास्त बक्षिसांची खैरात हार्दिक पांड्यावर झाली आहे. तीन बक्षिसांवर हार्दिकने आपले नाव कोरले आहे.

कोणत्या संघाने कोणता पुरस्कार जिंकला

विजेता गुजरात टायटन्स २० कोटी रुपये

उपविजेता राजस्थान रॉयल्स १२.५ कोटी रुपये

पर्पल कॅप- युजवेंद्र चहल १० लाख रुपये

ऑरेंज कॅप- जोस बटलर १० लाख रुपये

इमर्जिंग प्लेयर- उमरान मलिक १० लाख रुपये

सीझनचा सुपर स्ट्रायकर - दिनेश कार्तिक टाटा पंच कार

गेम चेंजर ऑफ द सीजन- जोस बटलर १० लाख रुपये

सर्वाधिक सिक्स- जोस बटलर १० लाख रुपये

पॉवर प्लेयर ऑफ द सीझन- जोस बटलर १० लाख रुपये

सीझन फेअर प्ले राजस्थान, गुजरात १० लाख रुपये

फास्टेस्ट डिलीवरी ऑफ द सीझन- लॉकी फॉर्युसन - १० लाख रुपये

कॅच ऑफ द सीझन- इविन लुइस १० लाख रुपये

मोस्ट वेल्यूवल प्लेयर- जोस बटलर १० लाख रुपये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सिरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; प्रॅक्टिसदरम्यान 'या' फलंदाजाच्या हाताला दुखापत

Devendra Fadnavis : सत्तास्थापनेसाठी शरद पवारांसोबत चर्चा, बैठकीला अदानी नव्हते; देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

Assembly Election 2024: १५८ पक्ष विधानसभेच्या रिंगणात, भाजप तिसऱ्या क्रमांकावर, सर्वाधिक जागा कोण लढवतंय?

Sugarcane Juice: उसाच्या रसाचे आरोग्यदायी फायदे!

Maharashtra News Live Updates: नाशिक जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार

SCROLL FOR NEXT