IPL 2022 Saam TV
क्रीडा

IPL 2022: दिल्लीच्या संघाला धक्का! 'हा' दिग्गज पहिले काही सामने बाहेर

डेव्हिड वॉर्नर दिल्ली कॅपिटल्ससाठी पहिले ४-५ सामने न खेळण्याचे कारण म्हणजे क्रिकेट ऑस्ट्रेलियाची मार्गदर्शक तत्त्वे तसेच शेन वॉर्नचा मृत्यू.

वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज आणि नुकताच ज्याचा आयपीएलच्या दिल्ली कॅपिटल संघात समावेश झाला त्या डेव्डिड वॉर्नरविषयी (David Warner) एक मोठी बातमी समोर येत आहे. वॉर्नरला दिल्लीने ६.२५ कोटींना विकत घेतले आहे. दिल्ली कॅपिटल्सने वॉर्नरला आपल्या संघात घेऊन आपली ताकद वाढवली होती. वॉर्नरसारखा धडाकेबाज फलंदाज संघात असणे म्हणजे फलंदाजीला बळकटी मिळते. मात्र, २६ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलपूर्वी (IPL 2022) दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) मोठा धक्का बसला आहे. डेव्हिड वॉर्नर आयपीएलच्या पहिल्या ४-५ सामन्यांमध्ये खेळू शकणार नसल्याच्या बातम्या आहेत. वॉर्नर सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर असून तो दौरा संपल्यानंतर तो ऑस्ट्रेलियाला जाणार आहे.

डेव्हिड वॉर्नर दिल्ली कॅपिटल्ससाठी पहिले ४-५ सामने न खेळण्याचे कारण म्हणजे क्रिकेट ऑस्ट्रेलियाची मार्गदर्शक तत्त्वे तसेच शेन वॉर्नचा मृत्यू. शेन वॉर्नच्या श्रद्धांजली सभेला तो उपस्थित राहणार असल्याचे डेव्हिड वॉर्नरने सांगितले आहे. शेन वॉर्नला ३० मार्चला श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. वॉर्नचे गेल्या आठवड्यात थायलंडमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

वॉर्नरच्या श्रद्धांजली सभेला वॉर्नर उपस्थीत राहणार

डेव्हिड वॉर्नर म्हणाला, 'आयपीएल असो वा नसो, पण वॉर्नरच्या श्रद्धांजली सभेला मी १०० टक्के जाणार आहे. मी लहान असताना माझ्या भिंतीवर वॉर्नचे पोस्टर होते. मला नेहमीच शेन वॉर्नसारखं व्हायचं होतं. लाहोर कसोटी संपल्यानंतर वॉर्नर थेट मेलबर्नला जाणार आहे. लाहोर कसोटी २५ मार्चला संपणार आहे.

...तरीही ५ एप्रिलपर्यंत वॉर्नर उपलब्ध नाही!

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या मार्गदर्शक सूचनांमुळे डेव्हिड वॉर्नर ५ एप्रिलपर्यंत आयपीएल २०२२ चा भाग होऊ शकत नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या सर्व खेळाडूंना ५ एप्रिलनंतरच आयपीएलमध्ये जाण्यास परवानगी दिली आहे. याचा अर्थ वॉर्नर 30 मार्च रोजी मेलबर्नमध्ये शेन वॉर्नच्या श्रद्धांजली सभेला उपस्थित राहणार आहे आणि ६ एप्रिल रोजी तो मुंबईत दाखल होणार आहे. यानंतर बीसीसीआयच्या नियमानुसार त्याला ५ दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे. क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर वॉर्नरची दोनदा आरटी-पीसीआर चाचणी करावी लागेल. दोन्हीही चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतरच त्याचा दिल्लीच्या बायो-बबलमध्ये समावेश होईल.

वॉर्नर दिल्ली कॅपिटल्सचे किमान पहिले ४ सामने खेळू शकणार नाही. आयपीएल २०२२ मध्ये दिल्लीचा पहिला सामना २७ मार्च रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे. यानंतर २ एप्रिलला गुजरात टायटन्स आणि ७ एप्रिलला लखनऊ सुपरजायंटशी होणार आहे. १० एप्रिलला दिल्लीचा संघ केकेआरशी भिडणार आहे. यानंतर १६ एप्रिलला दिल्लीचा सामना आरसीबीशी होईल. आयपीएल २०२२ मध्ये वॉर्नर पहिल्यांदाच आरसीबीविरुद्ध खेळताना दिसणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :जामनेर मध्ये मतमोजणी थांबवली

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT