Virat Kohli
Virat Kohli Saam TV
क्रीडा | IPL

धोनी बाद होताच कोहलीने दिली शिवी; ट्वीटरवर चाहत्यांनी विराटला झापलं

Pravin

आयपीएलच्या 15 (IPL 2022) व्या मोसमातील 49व्या सामना चेन्नई विरुद्ध बंगळुरु (CSK vs RCB) पार पडला. सीएसकेसाठी हा सामना खूप महत्त्वाचा होता. या सामन्यातील पराभवामुळे सीएसकेची प्लेऑफमध्ये जाण्याची आशा संपुष्टात आली आहे. सामन्यादरम्यान सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) बाद झाला तेव्हा विराट कोहलीने (Virat Kohli) वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेशन केले. कोहलीच्या सेलिब्रेशनच्या (Virat Kohli Viral Video) पाहून चाहते सोशल मीडियावर त्याला ट्रोल करत आहेत.

बुधवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध विराट 33 चेंडूत 30 धावा करून बाद झाला. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात बेंगळुरूने चेन्नईचा 13 धावांनी पराभव केला आहे. विराटची फलंदाजीतील खराब कामगिरी चाहत्यांसाठी चिंतेचा विषय आहे. अशा परिस्थितीत विराट पुन्हा एकदा चाहत्यांच्या निशाण्यावर आला जेव्हा त्याने सामन्यादरम्यान एमएस धोनीला बाद झाल्यानंतर शिवी देवून आपला आनंद व्यक्त केला. जोश हेजलवुडने धोनीला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला तेव्हा विराटला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही.

चेन्नईच्या डावातील 19व्या षटकात जोश हेझलवूड गोलंदाजीसाठी आला. हेझलवूडच्या या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर एमएस धोनी रजत पाटीदारकडे झेल देवून बाद झाला. क्षेत्ररक्षकाने झेल पकडताच सिमारेषेवरती उभ्या असलेल्या विराट असा आनंद व्यक्त केला की आता त्याला ट्रोल व्हावे लागले आहे. धोनी बाद होताच कोहली इतका संतापला की त्याने अपशब्द वापरले.

किंग विराटचे हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्याच्या या प्रतिक्रियेनंतर चाहत्यांनी आता विराटला ट्वीटरवरती चांगलच झापलं आहे. एका युजरने सोशल मीडियावर लिहिले की, 'अस्वीकार्य, तो अक्षरशः भारतीय सैन्याला म्हणजेच धोनीला शिव्या देत आहे. कोहली देशद्रोही आहे हे मला नेहमीच माहीत आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election : इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्याना करता आले नाही मतदान; ईडीसी प्रमाणपत्र वेळेत न मिळाल्याचा आरोप

APMC Vegetables Price News | भाज्यांची आवक घटली, दर वधारले!

Today's Marathi News Live : PM मोदी यांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र

Mallikarjun Kharge: नसीम खान यांचे राज्यसभा किंवा विधानसभेत पुनर्वसन करु, मल्लिकार्जुन खर्गेंनी दिलं आश्वासन

Mithila Palkar: हसताना तिला पाहिलं अन् खुळ्या जीवाला तिचा नाद लागला

SCROLL FOR NEXT