Mallikarjun Kharge: मुंबईतील काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी कशी दूर करणार? दिल्लीतून हायकमांडनं आखली रणनीती

Mallikarjun Kharge On Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत. अशामध्ये 'नसीम खान यांचं राज्यसभा किंवा विधानसभेत पुनर्वसन करु.', असे सूचक वक्तव्य काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले आहे.
Mallikarjun Kharge On Naseem Khan
Mallikarjun Kharge On Naseem KhanSaam Tv

मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून (Mumbai Loksabha Election) काँग्रेसने मुंबई काँग्रेसच्या अधयक्ष वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना उमेदवारी दिल्यामुळे आमदार नसीम खान (MLA Naseem Khan) नाराज झाले आहेत. नाराजी व्यक्त करत त्यांनी आपल्या स्टार प्रचारक पदाचा राजीनामा देखील दिला होता. नसीम खान यांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत. अशामध्ये 'नसीम खान यांचं राज्यसभा किंवा विधानसभेत पुनर्वसन करु.', असे सूचक वक्तव्य काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी केले आहे.

नाराज नसीम खान यांची मनधरणी करण्याचा काँग्रेसकडून गेल्या काही दिवसांपासून जोरदार प्रयत्न सुरू आहे. काँग्रेसने महाराष्ट्रातील एकाही जागेवर मुस्लिम उमेदवार दिला नसल्याची, टीका करत नसीम खान यांनी नाराजी व्यक्त केली होती. तिकीट न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याचे म्हटले जात होते. पण अशामध्ये त्यांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सूचक वक्तव्य केले आहे. 'नसीम खान यांचं राज्यसभा किंवा विधानसभेत पुनर्वसन करु', असे त्यांनी सांगितले. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

Mallikarjun Kharge On Naseem Khan
Balasaheb Thorat: कृपा करा; ३ लाखाच्या लीडची चर्चा करु नका... बाळासाहेब थोरातांचा ठाकरेंच्या उमेदवाराला सुचक सल्ला

मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले की, 'प्रश्न नो मुस्लिम म्हणण्याचा नाही. महाराष्ट्रात तीन पक्षांची आघाडी आहे. त्यामुळे तीन पक्षांमधून जी जागा आम्हाला मिळावी. ज्याठिकाणी आम्ही जिंकू शकतो तिथे तिन्ही पक्षांनी एकत्र येत निर्णय घेतला आहे. कोणाला आम्ही नाही म्हणालो. एकाद्या वेळी गैरसमज होतो.' तसंच, 'ते पक्षाचे चांगले कार्यकर्ते आहेत आणि लढणारे नेते आहेत. तुम्ही ज्याची गोष्ट करत आहेत ते मला माहिती आहे याचा विचार आम्ही पुढे करणार आहोत. त्यांना लोकं विचारतात का नाही मिळाली उमेदवारी. तिन्ही पक्ष एकत्र येत जेव्हा आघाडी बनवली जाते तेव्हा ते बघून उमेदवाराची निवड करावी लागते. पण पुढे त्यांच्याबद्दल विचार केला जाईल.' असे आश्वासन मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिले.

Mallikarjun Kharge On Naseem Khan
Devendra Fadnavis in Madha: माढ्याला ठोकशाही अन् दहशतीतून मुक्त करणार; देवेंद्र फडणवीस मोहिते-पाटलांवर कडाडले

नसीम खान नाराज असल्यामुळे मुंबईत काँग्रेसच्या काही प्रमुख नेत्यांची बैठक झाली. काँग्रेसच्या काही प्रमुख नेत्यांची वांद्रे कुर्ला संकुलातल्या एमसीए क्लब हाऊसमध्ये बैठक पार पडली. या बैठकीला नाराज नसीम खान यांच्यासोबत भाई जगताप, सुरेश शेट्टी, चंद्रकांत हंडोरे आणि इतर पदाधिकारीही उपस्थित होते. वर्षा गायकवाड या पक्षानं दिलेल्या उमेदवार आहेत त्यामुळं त्यांना आमचा विरोध नाही, असे मत चंद्रकांत हंडोरे यांनी व्यक्त केले. नसीम खान यांची समजूत काढण्यासाठी आणि उत्तर मुंबईत मुस्लिम उमेदवार देता येईल का? याबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

Mallikarjun Kharge On Naseem Khan
Dhananjay Mahadik Vs Satej Patil: मुश्रीफांवर झालेल्या अन्यायाचा धनंजय महाडिकांनी वाचला पाढा, कागलकरांना वचपा काढण्याचं केलं आवाहन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com