IPL 2021: सामन्याआधी चेन्नईला दोन धक्के! 'हा' असेल संभाव्य संघ
IPL 2021: सामन्याआधी चेन्नईला दोन धक्के! 'हा' असेल संभाव्य संघ Twitter
क्रीडा | IPL

IPL 2021: सामन्याआधी चेन्नईला दोन धक्के! 'हा' असेल संभाव्य संघ

वृत्तसंस्था

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) चा 14 व्या हंगामातील दुसरा टप्पा यूएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स (CSK vs MI) या दोन बलाढ्या संघांमध्ये दुबईमध्ये खेळला जाणार आहे. भारतात पहिल्या टप्प्यात, जेव्हा दोन्ही संघ आमनेसामने आले होते तेव्हा मुंबईने 4 गडी राखून दणदणीत विजय नोंदवला होता. आता महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली चेन्नईचा संघ त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरणार आहे, पण पुन्हा स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

संघातील दोन महत्त्वाचे परदेशी खेळाडू पहिल्या सामन्यातून बाहेर पडू शकतात. यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फाफ डु प्लेसिस आणि इंग्लंडचा युवा स्टार सॅम कुरन यांचा समावेश आहे. अलीकडच्या काळात दोघांनीही चेन्नईसाठी चमकदार कामगिरी केली आहे. डु प्लेसिस या मोसमात आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू आहे. त्याने 7 सामन्यांमध्ये 320 धावा केल्या आहेत. यादरम्यान, त्याने चार अर्धशतकं केली आहेत.

डुप्लेसिस मांडीच्या दुखापतीने त्रस्त आहे. तो सीपीएलच्या उपांत्य फेरीत सेंट लुसिया किंग्जविरुद्ध खेळला नव्हता. अशा परिस्थितीत डू प्लेसिस चेन्नईसाठी किती काळ खेळणार नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये. जर तो खेळला नाही तर चेन्नईच्या संघाला त्याची नक्की गरज भासणार आहे.

दुसरीकडे, जेव्हा सॅम करानचा विचार केला जातो, तेव्हा त्याने गोलंदाजीमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. करणचे 7 सामन्यात 9 बळी आहेत. या दरम्यान त्याने 8.68 च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली आहे. करणने फलंदाजीतही योगदान दिले आहे. त्याने 23.78 च्या सरासरीने आणि 150.67 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. करणने 25 चेंडूत 52 धावा केल्या. तो बुधवारी (15 सप्टेंबर) यूएईला पोहोचला. अशा परिस्थितीत त्याला मुंबईविरुद्ध खेळणे अवघड मानले जाते, कारण त्याला सहा दिवस (21 सप्टेंबरपर्यंत) क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल.

रॉबिन उथप्पा डु प्लेसिसच्या जागी ऋतुराज गायकवाड सोबत संघासाठी सलामीला येऊ शकतो. त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर मोईन अली, चौथ्या क्रमांकावर सुरेश रैना, पाचव्या क्रमांकावर अंबाती रायडू, सहाव्या क्रमांकावर महेंद्रसिंग धोनी, सातव्या क्रमांकावर रवींद्र जडेजा. लोअर ऑर्डरबद्दल बोलायचे झाल्यास, ड्वेन ब्राव्होला शार्दुल ठाकूर आणि दीपक चहरची साथ मिळू शकते. दुबईचे मैदान आणि खेळपट्टी लक्षात घेता असे मानले जाते की धोनी जादा फिरकीपटू संघात ठेवू शकतो. अशा परिस्थितीत इम्रान ताहिरला संधी मिळू शकते. जर धोनीला वेगवान गोलंदाजासोबत जायचे असेल तर लुंगी एन्गिडी ठेवू शकते.

संभाव्य संघ

ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, महेंद्रसिंग धोनी (C/ Wk), रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, इम्रान ताहिर/लुंगी एनगीडी.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Constituency: हे चार विधानसभा मतदारसंघ संवेदनशील जाहीर करा; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाची मागणी

Nashik Loksabha: मनधरणी निष्फळ! शांतीगिरी महाराज अपक्ष लढण्यावर ठाम; नाशिकमध्ये महायुतीची वाट बिकट?

ICICI Bank : NRI ग्राहकांसाठी ICICI बँकेचा महत्वपूर्ण निर्णय; परदेशातील मोबाईल नंबरवरून भारतात करता येणार UPI पेमेंट

सोनाक्षी सिन्हाच्या 'हिरामंडी'ची चाहत्यांना भुरळ, अभिनयाची होतेय चर्चा

Today's Marathi News Live : मुंबईतील खार दांडा परिसरात शिवसेना भाजपा कार्यकर्ते आमने-सामने

SCROLL FOR NEXT