PBKS vs SRH: पंजाबच्या 'या' दोन खेळाडूंवर नजर; भारताचा 'पोलार्ड' संघात येणार  Saam TV
क्रीडा

PBKS vs SRH: पंजाबच्या 'या' दोन खेळाडूंवर नजर; भारताचा 'पोलार्ड' संघात येणार

वृत्तसंस्था

IPL 2021: राजस्थान रॉयल्सविरुद्ध (RR) शेवटच्या षटकात 4 धावा करू न शकलेल्या पंजाब किंग्सचा (PBKS) सामना आज सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (SRH) होणार आहे. पंजाब किंग्स गुणतालिकेत 7 व्या स्थानावर आहेत. त्याचबरोबर हैदराबाद शेवटच्या म्हणजे आठव्या स्थानावर आहे. आजच्या सामन्यात पंजाब त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अनेक बदल करू शकते. रवी बिश्नोई आज गोलंदाजीत पुनरागमन करू शकतो, तर केएल राहुल दीपक हुड्डाच्या जागी शाहरुख खानला संधी देऊ शकतो.

राजस्थानविरुद्ध दीपकची कामगिरी काही विशेष नव्हती. त्याने 2 षटकांत 37 धावा दिल्या. महिपाल लोमरोरने त्याला एका षटकात 24 धावा ठोकल्या. त्याचबरोबर त्याने फलंदाजीतही निराशा केली. त्याला खातेही उघडता आले नाही. दीपकला आजच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाऊ शकते. त्याच्या जागी स्फोटक फलंदाज शाहरुख खानला संधी मिळू शकते. आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात या खेळाडूने आपल्या फलंदाजीने खूप प्रभावित केले. संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी त्यांना भारताचा किरॉन पोलार्ड म्हटले होते. शारुखमध्ये नेहमी त्याच्या फलंदाजीच्या बळावर सामना बदलण्याची क्षमता आहे. पहिल्या टप्प्यात त्याने 21.40 च्या सरासरीने 107 धावा केल्या आहेत.

त्याचवेळी दिल्लीविरुद्ध त्याने शेवटच्या षटकात 15 धावा केल्या होत्या. मात्र, पुढील 4 सामन्यांमध्ये त्याची बॅट शात राहिली. पण आयपीएल पुढे ढकलल्यानंतर त्याने टीएनपीएल 2021 मध्ये भाग घेतला. जिथे या खेळाडूने पुन्हा एकदा त्याच्या बॅटने गोलंदाजांना हैराण करुन सोडले. त्याने 52.50 च्या प्रभावी सरासरीने धावा केल्या. दीपक हुडाच्या अपयशानंतर हा खेळाडू संघात असल्याचे मानले जात आहे. त्याचबरोबर आजच्या सामन्यात रवी बिष्णोईही परतू शकतो. पहिल्या सामन्यात आदिल रशीदला पंजाबने संधी दिली होती. त्याची कामगिरी काही विशेष नव्हती.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : आणखीन एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

IND vs NZ : भारताची स्थिती 'गंभीर', किवींकडे ३५६ धावांची 'विराट' आघाडी; रोहितसेना पिछाडीवर!

SCROLL FOR NEXT