IPL 2021 च्या पहिल्या टप्प्यात काय घडलं?; जाणून घ्या एका क्लिकवर Twitter/ @IPL
क्रीडा

IPL 2021 च्या पहिल्या टप्प्यात काय घडलं?; जाणून घ्या एका क्लिकवर

आयपीएल 2021 (IPL 2021) च्या दुसऱ्या टप्याला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स (CSK vs MI) यांच्यात पहिला सामना होणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

आयपीएल 2021 (IPL 2021) च्या दुसऱ्या टप्याला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स (CSK vs MI) यांच्यात पहिला सामना होणार आहे. हा सामना क्रिक्रेट चाहत्यांसाठी पर्वणी असतो. क्रिकेट फॅन्स आयपीएल सुरुवातीकडे टक लावून होते. फॅन्सची अपेक्षा आहे की दुसरा टप्पा हा रोमांचक होणार आहे. आतापर्यंत 29 सामने झाले आहेत तर 31 सामने होणे बाकी आहे. आयपीएलचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे, तर त्या अगोदर आपण आयपीएलच्या पहिल्या टप्पात काय झाले ते पाहूयात.

सर्वाधिक धावा

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार शिखर धवन पहिल्या टप्प्यामध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. धवनने आतापर्यंत 8 सामन्यांमध्ये 380 धावा केल्या आहेत ज्यात 3 अर्धशतकांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात धवन उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. दुसऱ्या टप्यातही तो आपला फॅार्म कायम ठेवतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

सर्वाधिक बळी

हर्षल पटेलने पहिल्या टप्प्यात सर्वाधिक बळी घेतले आहेत. हर्षलने 7 सामन्यांमध्ये एकूण 17 बळी घेतले आहेत. हर्षल पटेल आयपीएलमध्ये आरसीबी संघाकडून खेळत आहे.

सर्वाधिक षटकार

आतापर्यंतच्या सामन्यापर्यंत पंजाब किंग्जच्या केएल राहुलने सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. राहुलने आतापर्यंत 7 सामन्यात 16 षटकार ठोकले आहेत. केएल राहुल दुसऱ्या फेरीत आपली झंझावाती फलंदाजी कायम ठेवतो का हे पाहणे रंजक ठरणार आहे.

सर्वाधिक झेल

पहिल्या टप्प्यात रविंद्र जडेजाने सर्वाधिक झेल घेतले आहेत. जडेजाने 7 सामन्यांत 8 झेल पकडण्यात यश मिळवले आहे. जडेजाने पूर्वार्धात आपल्या फलंदाजीनेही चमत्कार केला आहेत. दुसऱ्या टप्प्यातही सीएसकेला त्याच्याकडून अपेक्षा आहेत.

सर्वात लांब षटकार

किरन पोलार्डने पहिल्या टप्प्यात सर्वाधिक लांब षटकार ठोकला आहे. पोलार्डने या हंगामात 105 मीटर लांब षटकार मारला आहे. पोलार्ड दुसऱ्या टप्प्यातही स्फोटक फलंदाजी करेल अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.

सर्वात वेगवान अर्धशतक

मुंबई इंडियन्सच्या पोलार्डने या मोसमात सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम केला आहे. पोलार्डने चेन्नईविरुद्धच्या सामन्यात 17 चेंडूत अर्धशतक झळकावले. 1 मे 2021 रोजी CSK विरुद्धच्या सामन्यात त्याने 87 धावांची खेळी खेळली होती.

पहिल्या टप्प्यात शतक ठोकणारे फलंदाज

आरसीबीच्या देवदत्त पडिक्कलने आयपीएल 2021 च्या पूर्वार्धात शतक ठोकले आहे. पडिक्कलने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात 51 चेंडूत 101 धावांची खेळी खेळली होती. संजू सॅमसननेही या मोसमात शतक झळकावले आहे. संजूने पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात 63 चेंडूत 119 धावांची खेळी खेळली. सॅमसनने आपल्या खेळीदरम्यान 7 षटकार आणि 12 चौकार मारले आहेत. यासह, जोस बटलरने हैदराबादविरुद्ध 56 चेंडूत 124 धावांची शतकी खेळी केली, ज्यामध्ये त्याने 11 चौकार आणि 8 षटकार ठोकले होते.

आयपीएल गुणतालीका क्रमवारी

दिल्ली कॅपिटल्स (DC)

चेन्नई सुपर किंग्ज (CSK)

आरसीबी (RCB)

मुंबई इंडियन्स (MI)

राजस्थान रॅायल्स (RR)

पंजाब किंग्स (PKS)

केकेआर (KKR)

हैद्राबाद (SRH)

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंना मोठा धक्का;चंद्रकांत पाटील विजयाच्या वाटेवर

Radhakrushna Vikhe Patil : जनतेने महायुतीच्या धोरणावर शिक्कामोर्तब केलंय, विखे पाटलांची मोठी प्रतिक्रिया, पाहा Video

Maharashtra Assembly Election Result: महाराष्ट्रात भाजपच्या याशामागे आहेत २ सूत्रधार, अमित शहांनी दिली होती मोठी जबाबदारी

पुन्हा येईन! भाजपच मोठा भाऊ, देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का?

Pravin Darekar: महाराष्ट्राच्या जनतेची पुन्हा आम्हाला पसंती, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया | Video

SCROLL FOR NEXT