भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 19 सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) च्या दुसऱ्या टप्प्यात इंग्लिश क्रिकेटपटूंच्या (England Cricketar) खेळण्याची पुष्टी केली आहे. इंग्लंड आणि बांगलादेश (END vs BAN) यांच्यातील मालिका पुढे ढकलल्याने इंग्लंडच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची दारे खुली झाली आहेत. इंग्लिश खेळाडूंना आगामी टी -20 विश्वचषकाच्या तयारीसाठी आयपीएलचा वापर करायचा आहे. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यानंतर टी-20 विश्वचषक यूएई आणि ओमानमध्ये होणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंडच्या खेळाडूंच्या सहभागासाठी बीसीसीआयला इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाकडून मान्यता मिळाली आहे. बीसीसीआयचे इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यासोबत मैत्रापुर्ण संबंध आहेत. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये इंग्लंड आणि बांगलादेश तीन वनडे आणि तीन टी -20 सामने खेळणार होते. पण बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (BCB) मुख्य कार्यकारी अधिकारी निजामुद्दीन चौधरी यांनी म्हटले आहे की, ''टी -20 विश्वचषकानंतर इंग्लंडविरुद्धची मालिका पुन्हा आयोजित करण्याचा बोर्ड प्रयत्न करत आहे''.
बीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी निजामुद्दीन चौधरी म्हणाले, "दोन्ही संघ (बांगलादेश आणि इंग्लंड) टी -20 विश्वचषकापूर्वी बरेच क्रिकेट खेळत आहेत, म्हणून आम्ही ईसीबीशी चर्चा करत आहोत की विश्वचषकानंतर मालिका आयोजित केली जाऊ शकते का." पुढे ते म्हणाले, “जर टी 20 विश्वचषकानंतर मालिका आयोजित करायची असेल तर ती कधी आयोजित केली जाऊ शकते हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे.
गेल्या महिन्यात, बीसीसीआयने उर्वरित आयपीएल 2021 चे वेळापत्रक जाहीर केले. जे संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये होणार आहे. एकूण 31 सामने 27 दिवसांच्या आत खेळले जाणार आहेत. आयपीएलचा 14 वा हंगाम यावर्षी मे मध्ये कोविड -19 साथीमुळे पुढे ढकलण्यात आला होता. आता त्याचा दुसरा टप्पा 19 सप्टेंबर रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्या ब्लॉकबस्टर लढतीने सुरू होणार आहे.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.