भारतीय हॉकी संघाची विजयी घोडदौड थांबली; आता 'कांस्य'ची अपेक्षा

टोकियो ऑलिम्पिक मध्ये पुरुष हॉकीतील सेमीफायनल मध्ये भारत आणि बेल्जियम यांच्या मध्ये झालेली मॅच सुरुवातीला खूपच अटीतटीची झाल्याचे बघायला मिळाले आहे.
भारतीय हॉकी संघाची विजयी घोडदौड थांबली; आता 'कांस्य'ची अपेक्षा
भारतीय हॉकी संघाची विजयी घोडदौड थांबली; आता 'कांस्य'ची अपेक्षाSaam Tv
Published On

टोकियो : टोकियो ऑलिम्पिक Tokyo Olympics मध्ये पुरुष हॉकीतील hockey सेमीफायनल Semifinals मध्ये भारत India आणि बेल्जियम Belgium यांच्या मध्ये झालेली मॅच सुरुवातीला खूपच अटीतटीची झाल्याचे बघायला मिळाले आहे. भारतीय हॉकी टीमला विश्वविजेत्या बेल्जियमने ५- २ असे पराभूत केले आहे. मॅचची सुरूवात होताच बेल्जियमने भारतीय हॉकी टीम विरुद्ध पहिला गोल केले होते.

यानंतर भारतीय टीमने सुद्धा बेल्जियम विरुद्ध गोल करत असतानाच बरोबरी केली आहे. यानंतर भारतीय टीमने आणखी १ गोल करत २- १ ने आघाडी घेत राहिली होती. मग, बेल्जियमच्या टीमने देखील गोल करत २- २ ने बरोबरी केली होती. यानंतर पुन्हा बेल्जियमच्या टीमने एका मागे एक असे २ गोल करत ५- २ ने आघाडी घेतली आणि विजय मिळविला आहे.

हे देखील पहा-

भारतीय हॉकी टीमचा पराभव झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi यांनी ट्विट Tweet करत म्हटले आहे की, जिंकणे आणि पराभूत होणे हा जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे. टोकियो ऑलिम्पिक मधील पुरुष हॉकी संघाने त्यांचे सर्वोत्तम प्रदर्शन दाखवले आहे, आणि तेच सर्वात महत्त्वाचे मानले आहे. टीमला पुढील सामन्याकरिता आणि त्यांच्या भविष्यामधील प्रयत्नांसाठी शुभेच्छा. भारताला आमच्या सर्व खेळाडूंचा मला अभिमान आहे.

भारतीय हॉकी संघाची विजयी घोडदौड थांबली; आता 'कांस्य'ची अपेक्षा
Tokyo Olympics : भारतीय महिला हॉकी संघाची सेमी फायनलमध्ये धडक...

पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील भारत विरुद्ध बेल्जियम ही सेमीफायनल मॅच लाईव्ह बघत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन, भारतीय टीमला प्रोत्साहन दिले आणि शुभेच्छा देखील दिल्या आहेत. आपल्या ट्विटमध्ये मोदींनी म्हटले की, मला माझ्या टीमचा आणि त्यांच्या कौशल्याचा अतिशय अभिमान आहे. २०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिक मधील बेल्जियमने भारताचा ३- ० ने पराभव केला होता. तर २०१६ मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये बेल्जियमने ३- १ ने पराभूत करण्यात आले होते.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com