ms dhoni  saam tv
Sports

MS Dhoni Quotes: 'माही' आवडे सर्वांना... पण का?

MS Dhoni Birthday Inspirational Quotes: भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएम धोनीच्या वाढदिवशी वाचा, प्रेरणादायी कोट्स.

Ankush Dhavre

श्वेता भालेकर परब, वृत्तनिवेदक, साम टीव्ही, मुंबई>>

'महेंद्रसिंह धोनी' या नावातच सगळं आलं. आज 'थला' म्हणजेच आपला धोनी ४३ वर्षांचा झाला पण तो सर्वांना इतका का आवडतो? क्रिकेटपटू म्हणून तो यशस्वी आहेच पण त्याच्या विचारांचे, वागण्या - बोलण्याचेही अनेक चाहते आहेत.

चला तर मग जाणून घेऊयात, त्याचे काही महत्वाचे प्रेरणादायी विचार ( quotes )

* आयुष्यातला संकटांचा काळ तुम्हाला 'उत्तम माणूस' म्हणून घडवतो. त्यामुळे संकटाला घाबरू नका.

* जीवनात ठरवल्याप्रमाणे गोष्टी होत नाहीत तेव्हा सर्वांनाच नैराश्य येतं, चिडचिड होते. मात्र तसं न करता त्या परिस्थितीत नेमकं काय करायचं ते ठरवा.

* स्वतः शी कायम प्रामाणिक राहा तरच तुम्ही दुसऱ्यांशी प्रामाणिक राहू शकाल, आपल्या ध्येयाशी प्रामाणिक राहू शकाल.

* ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करा. मग ते नातेवाईक असो वा कामाच्या ठिकाणची मंडळी. सर्वांना समान वागणूक द्या.

* ध्येय गाठण्यासाठी मेहनत कराच, सोबत त्याविषयातल्या गोष्टी शिका त्यात निपुण व्हा.

स्वतः तलं वैगुण्य / कमतरता ओळखा. त्यावर मेहनत घ्या.

* वर्तमानात जगा, वर्तमानावर लक्ष केंद्रीत करा कारण त्याचाच परिणाम भविष्य ठरवतो.

* भविष्याची धोरणं ठरवताना नेहमी साधा सरळ विचार करा, हीच यशाची मुख्य गुरुकिल्ली आहे.

* सकारात्मक राहा, कुठलंही काम करताना झोकून द्या. निकालापर्यंत वाट पाहा त्याआधीच हार मानू नका.

* एखादं ध्येय ठरवल्यावर आधीच यशापयशाचा ( win or loss ) विचार नका करू, ती प्रक्रिया आनंदाने अनुभवा, त्यातून हसत खेळत शिका.

* हरण्याची वेगळी गंमत असते कारण पराभव आपल्याला पुन्हा स्वतःला सिद्ध करायला संधी देतो, नव्याने घडवतो.

* नेहमी मदत मागा. आपले आई, वडील, मित्रमैत्रिणी, मार्गदर्शक कुणीही असो.

* मुख्य म्हणजे जर ध्येय साध्य करायचं तर शरीर सुदृढ ठेवा. बॅडमिंटन, टेनिस, फुटबॉल, क्रिकेट कुठलाही खेळ खेळा पण दररोज काही वेळ खेळा.

हुशारी, मेहनत यासोबतच शांत स्वभाव, कामाचा ताण हाताळण्याच्या क्षमतेमुळेच महेंद्रसिंह धोनी सर्वोत्तम कर्णधार आणि माणूस म्हणून ओळखला जातो. खुद्द क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंच माहीचं कौतुक केलं होतं.. " He is the Best Captain I have played under". तर असा सर्वांनाच आवडणारा हा धोनी.

मग 'माही' चे हे विचार पटले ना. चला तर त्याला शुभेच्छा देऊयात. वाढदिवसाच्या शुभेच्छा, कॅप्टन कूल... ☺️

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karisma Kapoor: दिवाळी स्पेशल करिश्मा कपूरच्या बोल्ड साडी लूक पाहून चाहाते घायाळ, PHOTO व्हायरल

Dhanashree Kadgaonkar Photos: मन तळ्यात मळ्यात.. जाईच्या कळ्यात, टिव्हीच्या वहिनीसाहेबाचं सौंदर्य खुललं

ट्रेकिंग करताना पक्षाघात, पण ८४ वर्षीय करवंदे काका हरले नाहीत; १७०६ वेळा सर केला सिंहगड किल्ला!

Snake Hidden Inside Scooter: अरे बापरे बाप! स्कुटीला स्टार्टर मारणार तोच फुसफुसला, हेडलाइटमध्ये लपला होता विषारी साप, VIDEO

Maharashtra Live News Update : उदयनराजे-जयकुमार गोरे यांच्यात मिश्कील दिलजमाई

SCROLL FOR NEXT