ruturaj gaikwad riyan parag yandex/twitter
Sports

Ruturaj Gaikwad: धोनीचा भिडू ऋतुराजला गंभीरकडून बाहेरचा रस्ता! फॉर्ममध्ये नसलेल्या रियान परागची निवड

SL vs IND, Team India Squad: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेनंतर नव्या संघाच्या संघबांधणीला सुरुवात केली आहे. या स्पर्धेनंतर कर्णधार रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला आहे. तर राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला आहे. गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षकपदी विराजमान झाला आहे. तर रोहितच्या जागी सूर्यकुमार यादवची टी-२० संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. गुरुवारी भारताच्या श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान या संघाची निवड होताच, गौतम गंभीर आणि बीसीसीआयवर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

बीसीसीआयने श्रीलंका दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली आहे. या संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचं मिश्रण असल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान टी-२० संघातून ऋतुतराज गायकवाडला डच्चू देण्यात आला आहे. झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या मालिकेत ऋतुराज गायकवाडने शानदार कामगिरी केली होती. त्याने ४ सामन्यांमध्ये १३३ धावा चोपल्या होत्या. मात्र तरीदेखील त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही.

ऋतुराज गायकवाडऐवजी रियान परागला भारतीय संघात स्थान देण्यात आलेलं आहे. आयपीएल २०२४ स्पर्धेत शानदार कामगिरी करणाऱ्या रियान परागला भारतीय संघात स्थान देण्याची मागणी जोर धरु लागली होती.त्याला झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत संधी मिळाली. मात्र तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. त्याला ३ सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याला अवघ्या २४ धावा करता आल्या. फ्लॉप शो असूनही त्याला भारतीय टी-२० संघात स्थान दिलं. तर इन फॉर्म ऋतुराज गायकवाडला स्थान न मिळाल्याने फॅन्स संताप व्यक्त करताना दिसून येत आहेत.

नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया

भारत-श्रीलंका मालिकेसाठी असा आहे भारतीय टी-२० संघ

भारताचा टी-२० संघ - सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उप कर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग,हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल,खलिल अहमद, मोहम्मद सिराज.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

Malshej Ghat Kalu Waterfall Tragedy : मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर, ३०० पर्यटक अडकले; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

SCROLL FOR NEXT