INDvsAUS 1st ODI
INDvsAUS 1st ODI Saam TV
क्रीडा | IPL

INDvsAUS 1st ODI: केएल राहुल चमकला, जडेजाचीही मिळाली साथ; टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सने दणदणीत विजय

साम टिव्ही ब्युरो

IND vs AUS 1st ODI: पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पाच गडी राखून पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघ 188 धावांवर गारद झाला होता. टीम इंडियानं हे आव्हान 39.5 षटकांत गाठलं. तीन सामन्यांची मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी मिळवली आहे.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या किरकोळ 188 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची दमछाक झाली. भारताची सुरुवात खराब झाली. अवघ्या 39 धावांवर भारताने चार विकेट गमावल्या होत्या. त्यामुळे सोपा वाटणारा विजय टॉप ऑर्डर फेल गेल्याने काहीसा कठीण वाटू लागला होता. (Latest sports updates)

मात्र केएल राहुल आणि रविंद्र जडेजा यांच्या संयमी खेळीमुळे भारताने ऑस्ट्रेलियाचा पाच गडी राखून विजय मिळवला. केएल राहुलने सर्वाधिक नाबाद 75 धावा केल्या. या खेळीत त्याने सात चौकार आणि एक षटकार लगावला. रविंद्र जडेजानेही नाबाद 69 चेंडूत 45 धावा करत त्याला साथ दिली. तर शुभमन गिल आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी 20 आणि 25 धावा केल्या.

वानखेडेवर तब्बल 16 वर्षांनी पराभव

टीम इंडियाने वानखेडे स्टेडियमवर 16 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला एकदिवसीय सामन्यात पराभूत केले आहे. या मैदानावर दोघांमध्ये पाच एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने तीन आणि ऑस्ट्रेलियाने दोन सामने जिंकले आहेत. टीम इंडियाने या मैदानावर 2007 मध्ये एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा शेवटचा पराभव केला होता. त्यानंतर 2020 मध्ये या मैदानावर ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. आता तब्बल 16 वर्षांनंतर भारताने पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाला हरवण्यात यश मिळवले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khalistani Terrorist: हरदीपसिंह निज्जर हत्या प्रकरणात 3 संशयितांना अटक; कॅनडा पोलिसांची कारवाई, भारतावर गंभीर आरोप

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, मेषसह ४ राशींसाठी ‘शनिवार’ भाग्याचा; फक्त 'या' गोष्टीची घ्या काळजी

Cibil Score: कमी झालेला सिबिल स्कोअर ७०० पार कसा कराल? 'या' टिप्स सुधारतील तुमचा स्कोअर

Ankita Lokhande: हृदयस्पर्शी कॅप्शनसह अंकिता लोखंडेने पतीसोबतचा रुग्णालयातील फोटो केला शेअर

Maharashatra Elction: कोकणात ठाकरे विरुद्ध ठाकरे लढाई; उद्धव आणि राज ठाकरेंच्या सभांचा झंजावात

SCROLL FOR NEXT