Asian Para Games Sheetal Devi Twitter
क्रीडा

Asian Para Games: जम्मू काश्मीरच्या शीतल देवीची कमाल; पायाने तिरंदाजी करत साधला २ सुवर्ण पदकावर निशाणा

Asian Para Games : जम्मू-काश्मीरच्या १६ वर्षीय शीतल देवीने आशियाई पॅरा गेम्समध्ये कमाल केलीय. एका सत्रात तिने दोन सुवर्ण पदक जिंकली आहेत.

Bharat Jadhav

Sheetal Devi Archer :

भारतासाठी आशियाई पॅरा गेम्समध्ये आजचा दिवस आनंदाचा ठरला. भारताने आशियाई पॅरा गेम्समध्ये दोन सुवर्णपदके आणि एक रौप्यपदक जिंकलं. भारतीय १६ वर्षीय तिरंदाज शीतल देवीने आपल्या पायाने दोन सुवर्ण पदकांवर निशाणा साधत देशाचं नाव उंचावलं. शीतल देवीने तिरंदाजीमध्ये एका सत्रात दोन सुवर्ण पदक जिंकून मोठी कामगिरी केलीय. एकाच सत्रात दोन सुवर्ण पदक जिंकणारी ती भारताची पहिली महिला ठरलीय. तिने आज महिला वैयक्तिक तिरंदाजी प्रकारात अव्वल स्थान पटकावलं.

शीतलने शुक्रवारी सकाळी भारताच्या पदकांच्या संख्येत भर घातली. मिश्र सांघिक कंपाऊंड तिरंदाजीमध्ये सुवर्ण आणि महिला दुहेरी कंपाऊंड तिरंदाजीमध्ये रौप्यपदक जिंकल्यानंतर, शीतल देवीची वैयक्तिक महिला कंपाऊंड स्पर्धेत सिंगापूरच्या अलीम नूर स्याहिदाविरुद्ध लढत झाली. यात शीतलने सुवर्ण पदक मिळवलं. (Latest News)

अलीम नूर स्याहिदा सोबतच्या लढतीत शीतलने आपलं कौशल्य दाखवलं. अंतिम फेरीत कोणत्यातही खेळाडूवर दबाव येत असतो. परंतु शीतलने एखाद्या अनुभवी खेळाडू सारखं खेळत करत शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये सलग सहा १० रिंग्ज मारल्या आणि देशाला एक सुवर्णपदक मिळवून दिलं. (सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा)

दरम्यान शीतलचा जन्म जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील लोई धार या दुर्गम गावात झालाय. जन्मजात तिला फोकोमेलिया या आजाराने ग्रासलं होतं. या विकारामुळे अवयवांचा विकास होत नाही. दुर्गम गावात ते थेट आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रापर्यंत पोहोचण्याचा तिचा प्रवास हा चकीत करणारा आहे.

शीतलचा हा प्रवास २०१९ मध्ये किश्तवाडमधील युवा क्रीडा स्पर्धेतपासून सुरू झाला. या खेळात भारतीय सैन्याच्या नजरेत शीतल बसली. त्यानंतर भारतीय लष्कराने तिला लहान असतानाच दत्तक घेतलं. तिला कृत्रिम हात मिळवून देण्याची योजना होती, परंतु जेव्हा ती पूर्ण झाली नाही. त्यानंतर शीतलने तिरंदाजीशी ओळख केली. सुरुवातीला तिला नेम धरता येत नव्हता परंतु तिने धीर धरत आपल्या निश्चयचा नेम धरला.

जोपर्यंत तिला धनुष्यबाण व्यवस्थित उचलता येत नाही तोपर्यंत तिने अनेक महिने सराव केला. शीतलने २०२२ मध्येच तिरंदाजीला सुरुवात केली आणि राष्ट्रीय चॅम्पियनशिपच्या टूरने पॅरा स्पोर्ट्सबद्दलचा तिचा दृष्टिकोन बदलला.

तिच्या कामगिरीविषयी बोलाताना तिचे प्रशिक्षक कुलदीप कुमार म्हणाले, “मी तिला अकादमीत येण्यास सांगितले. इतर लोकांना शूटिंग करताना पहण्यास सांगितलं. शीतलने झपाट्याने प्रगती केली. मी तिला राष्ट्रीय स्पर्धेत नेले. तेथे ती प्रेरित झाली. आणि तिने वेगवेगळ्या अपंग असलेल्या अनेक पॅरा तिरंदाजांना पाहिले. त्यानंतर तिचं खेळेत आवड निर्माण झाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

Maharashtra News Live Updates: महायुतीची आज कोल्हापूरमध्ये मोठी प्रचार सभा

Azaad Teaser Released : अजय देवगणचा 'आझाद' येतोय; मामा-भाचा एकाच सिनेमात, अॅक्शनचा धमाका, टीझर पाहाच!

VIDEO : आम्हाला त्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, राज ठाकरेंच्या 'त्या' विधानावर राऊतांची प्रतिक्रिया | Marathi News

Sangli Politics: लोकसभेप्रमाणे विधानसभेतही बंडखोरीचा पॅटर्न; सांगलीत काँग्रेस खासदाराची अपक्ष उमेदवाराला साथ

SCROLL FOR NEXT