Manoj Jarange: कोण उठलं मनोज जरांगेंच्या जीवावर? जरांगेंच्या हत्येसाठी अडीच कोटींची सुपारी?

Jalna police investigation in Manoj Jarange: मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट समोर आलाय.. त्यांना मारण्यासाठी तब्बल अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आल्याचं उघड झालंय. नेमका कट काय होता? कोणत्या मोठ्या नेत्याचा यात हात आहे?
manoj jarange
manoj jarangeSaam Tv
Published On

मराठा आंदोलनासाठी सत्ताधाऱ्यांविरोधात हल्लाबोल करणारे जरांगे पाटील पुन्हा एकदा चर्चेत आलेत... जरांगे पाटलाच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस घडलाय.. त्यामुळे जालना पोलिस अॅक्शन मोडवर आले आणि दोन संशयितांनी त्यांनी ताब्यात घेतलं... याप्रकरणात पोलिसांकडून अधिकचा तपासही केला जातोय..

जरांगेंच्या हत्येचा कट रचण्यासाठी बीडमध्ये बैठका झाल्या... हत्येसाठी तब्बल अडीच कोटींची सुपारी देण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय....मध्यरात्री जरांगेंच्या सहकाऱ्यांकडून जालना पोलीस अधीक्षकांना याबाबत निवेदन देण्यात आलं...अमोल खुणे, दादा गरुड या दोन संशयितांना गेवराईमधून पोलिसांनी ताब्यात घेतलयं... त्यात अमोल खुणे हा मनोज जरांगे पाटील यांचा जुना सहकारी असल्याची माहिती समोर आलीय...

हत्येचा कट रचला असून एका मोठ्या नेत्याचा यात हात असल्याचा मोठा आरोप स्वत: जरांगेंनीही केलाय. तर दुसरीकडे जरांगेंच्या अवतीभोवतीच्या लोकांचे सीडीआर तपासा...असा खोचक टोला ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी लगावलाय.

याप्रकरणानंतर मनोज जरांगे यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलीय..संशय़ितांची कसून चौकशी करण्यात येतेय.. मात्र जरांगे पाटलांना जीवे मारण्याचा कट कोणत्या उद्देशाने रचण्यात आला? जरांगेंना जीवे मारण्यासाठी कोट्यवधीची सुपारी देणारा बडा नेता कोण? या मागे आरक्षणाचा मुद्दा आहे की आणखी काही? या सगळ्यांची चौकशी करण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com