Ravi kumar dahiya wins gold in CWG 2022
Ravi kumar dahiya wins gold in CWG 2022 saam tv
क्रीडा | IPL

Commonwealth Games 2022 : रवी दहियाचा गोल्डन डाव, भारतासाठी आजही 'सूवर्ण' दिवस

नरेश शेंडे

बर्मिंघम : येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये भारतीय खेळाडूंनी सुवर्ण भरारी घेतली आहे. कांस्य, रौप्य आणि सूवर्ण पदकांवर भारताच्या खेळाडूंनी विजयाची मोहोर उमटवली आहे. कालचा दिवसही भारतासाठी सोन्यासारखा होता. प्रसिद्ध कुस्तीपटू बंजरंग पुनिया आणि साक्षी मलिकने गोल्डन डाव टाकत (Gold Medal) सूवर्ण पदक जिंकले. ही बातमी ताजी असतानाच आता पुन्हा एकदा भारताच्या इतिहासात सोनेरी पानाची भर पडली आहे. कारण भारताचा स्टार कुस्तीपटू रवी कुमार दहियाने (Ravi Kumar Dahiya) पुरुषांच्या ५७ किलो वजनी फ्रीस्टाईल गटात गोल्ड मेडल जिंकले आहे. दहियाने नायजेरियाच्या एबिकेनेनिमो वेल्सनचा १०-० असा पराभव केला. दरम्यान, यावर्षी सुरु असलेल्या (Commonwealth Games 2022 ) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे हे कुस्ती खेळातील चौथे पदक आहे. तर एकूण १० वे सूवर्ण पदक आहे.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रवी कुमार दहिया पहिल्यांदाच मैदानात उतरला आणि पहिल्या स्पर्धेत अंतिम सामन्यात सोनेरी डाव टाकून सूवर्ण पदकाची कमाई केली. रवी दहियाने सामन्याच्या सुरुवातीलाच नायजेरियाच्या कुस्तीपटूवर मैदानी डाव टाकले. पण रवीने गटरेज हा डाव खेळल्यानंतर त्याला पहिला फेरीत ८ गुण मिळवता आले. त्यानंतर रवीने दुसऱ्या फेरीत उरलेले दोन गुण मिळवून सामना १०-० ने जिंकला.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये भारतीय खेळाडूंनी पदकांची लयलूट केली आहे. भारताचा प्रसिद्ध कुस्तीपटू बजरंग पुनियाचीही (Bajrang Punia) या स्पर्धेत सुवर्ण झळाली पाहायला मिळाली.बंजरंगने काल शुक्रवारी अप्रतिम खेळ करत ६५ किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकण्याची चमकदार कामगिरी केली.तसेच साक्षी मलिकनेही (Sakshi Malik)राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून राष्ट्रकुल पदकांची हॅट्ट्रिक केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report | पैज लावाल, तर मग तुरुंगात जाल! दोन मित्रांना पैज चांगलीच भावली..

Pune hit And Run Case : पुणे हिट अँड रन प्रकरण; 'त्या' अल्पवयीन मुलाला काय झाली शिक्षा? जाणून घ्या

Today's Marathi News Live: नवी मुंबईत या वाहनांना प्रवेश बंदी, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Pune Hit and Run Case | पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे प्रताप उघड

Special Report | ..तर पक्ष फुटला असता! शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

SCROLL FOR NEXT