Indian women hockey player dies in accident saam tv
Sports

Julie Yadav: मोबाईल घरी विसरली म्हणून पुन्हा घरी गेली आणि...! भारतीय महिला हॉकी खेळाडूचा अपघतात मृत्यू

Indian women hockey player dies in accident: भारतीय महिला हॉकी संघातील खेळाडूचं रस्ते अपघातात निधन झालं आहे. ही घटना अत्यंत हृदयद्रावक असून, केवळ एका क्षुल्लक कारणामुळे तिचा जीव गेला.

Surabhi Jayashree Jagdish

रविवारी लखनऊमध्ये झालेल्या एक रस्ते अपघातात नॅशनल एथलिट आणि हॉकी प्लेअर ज्युली यादवचा मृत्यू झाला आहे. ज्युली एलपीएस शाळेत स्पोर्ट्स टीचर होती. बॅडमिंटन चॅम्पियनशिपसाठी ती शाळेत जात होती. मिळालेल्या माहितीनुसार, ज्युलीला घरातून फोन आला होता, त्यावेळी ती घरी परतत असताना तिच्या बाईकची टक्कर ट्रकशी झाली असता या अपघातात तिचा मृत्यू झाला आहे.

मोाबईल घरी विसरली होती

लखनऊच्या पारा ठाणे भागात असलेल्या एका वळणावर ही घटना घडलीय. मृत व्यक्ती ज्युली २३ वर्षांची होती. ज्युली एलडीए कॉलनी सेक्टर- आयमध्ये असलेल्या एलपीएल शाळेत प्रायमरी विभागात स्पोर्ट्स टीचर होती. रविवारी सकाळी शाळेत इंटर स्कूल बॅडमिंटन चॅम्पियनशिप होणार होती. या चॅम्पियनिपची ती इन्चार्ज होती.

समोर आलेल्या माहितीनुसार, ज्युली सकाळी लवकर शाळेत पोहोचली होती. मात्र तिला शाळेत गेल्यावर समजलं की, ती तिचा फोन घरीच विसरून आलीये.त्यामुळे तिने तात्काळ तिची बाईक घेतली आणि घरी परली. परंतु मौदा मोडजवळ सिलेंडरने भरलेल्या ट्रकने तिला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की ज्युली रस्त्यावर कोसळली आणि ट्रकचे चाक तिच्या अंगावरून गेलं.

अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ अ‍ॅम्ब्युलन्सला फोन करून तिला ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केलं. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि डॉक्टरांनी ज्युलीला मृत घोषित केलं.

कुटुंबावर दुःखाचा डोंगर

ज्युली यादवच्या अचानक मृत्यूमुळे तिच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. वडील अजय यादव आणि आई या दोघांची अवस्था अत्यंत वाईट असून त्या खूप मोठा धक्का बसला आहे. कुटुंबीयांनी सांगितलं की, ज्युली अत्यंत प्रेमळ आणि मदतीस तत्पर मुलगी होती.

ज्युली मौदा गावातील रहिवासी होती आणि तिच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावात तसंच तिच्या शाळेत शोकाचं वातावरण आहे. तिच्या सोबत काम करणाऱ्या व्यक्ती आणि शिक्षकांनीही तिच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली आहे.

ट्रक चालक फरार, पोलिसांचा तपास सुरू

अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. या प्रकरणी पारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी माहिती दिली की, घटनेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत आणि ट्रक चालकाचा शोध सुरू आहे. यावेळी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलंय की, जर कोणाकडे या अपघातासंदर्भात कोणतीही माहिती असेल, तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : ऊस दरासाठी शेतकरी आक्रमक

फलटण डॉक्टर प्रकरणी काँग्रेस आक्रमक; वर्षा बंगल्याला घेराव घालण्याचा इशारा|VIDEO

Politics: धुळ्यात मोठी राजकीय घडामोड, भाजपला एकनाथ शिंदेंकडून जोरदार दणका; बड्या नेत्यांनी हाती घेतलं 'धनुष्यबाण'

Should eggs be washed before eating: अंडी खाण्यापूर्वी का धुतली पाहिजेत? तज्ज्ञांनी सांगितलं कारण

Bharli Bhendi Recipe: शेंगदाण्याचा कूट घालून बनवा गावरान स्टाईल भरली भेंडी,१० मिनिटांत तयार

SCROLL FOR NEXT