Indian volleyball team creates history in asian games 2023 beats south korea by 3-2 volleyball news in marathi  Twitter
Sports

Asian Games 2023: भारतीय व्हॉलीबॉल संघाने रचला इतिहास! ३ वेळच्या गोल्ड मेडलिस्ट दक्षिण कोरियावर केली मात

India Volleyball Team: भारतीय व्हॉलीबॉल संघाने इतिहास रचला आहे.

Ankush Dhavre

Asian Games 2023:

चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेतील व्हॉलीबॉल खेळात भारतीय खेळाडूंनी दमदार खेळ केला आहे. भारत आणि दक्षिण कोरिया या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना रंगला.

या सामन्यात भारतीय खेळाडूंनी दक्षिण कोरीयावर ३-२ ( २५-२७,२९-२७, २५-२२,२०-२५, १७-१५) ने विजय मिळवला आहे. यासह भारतीय संघाने इतिहास रचला आहे.

भारतीय संघाकडून खेळताना अशवाल राय आणि अमित गुलियाने मोलाची भूमिका बजावली आहे. या दोघांनी भारतीय संघाला महत्वाचे पॉइंट्स मिळवून दिले. आता भारतीय संघाचा पुढील सामना चिनी ताईपे आणि मंगोलिया संघासोबत होणार आहे.

भारतीय संघ आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याच्या प्रतीक्षेत आहे. १९८३ मध्ये भारतीय संघाने कांस्यपदकाला गवसणी घातली होती. तर जकार्ता आणि इंडोनेशियात झालेल्या स्पर्धेत भारतीय संघाला १२ व्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं होतं. (Latest sports updates)

दक्षिण कोरियाला हरवत रचला इतिहास..

दक्षिण कोरियाने आतापर्यंत ३ वेळेस सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. महिला आणि पुरुषांनी मिळून आतापर्यंत ३१ पदकं जिंकली आहेत. तर भारतीय संघाला केवळ ३ पदकं जिंकता आली आहेत.

भारतीय महिला हॉकी संघ चीनला रवाना..

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला हॉकी संघ चीनला रवाना झाला आहे. भारतीय महिला संघाने मंगळवारी उशिरा रात्री बंगळुरू विमानतळावरून चीनची फ्लाईट पकडली आहे. ए ग्रुपमध्ये भारतीय संघासह हाँगकाँग, मलेशिया, सिंगापूर आणि कोरिया हे संघ असणार आहेत. तर जपान, थायलंड, चीन, कजाकिस्तान आणि इंडोनेशिया हे बी ग्रुपमध्ये असणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar Crime: शिक्षकी पेशाला काळीमा! आश्रमशाळेतील आठवीच्या विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाकडून बलात्कार

शरद पवारांना मोठा धक्का; पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांचा राजीनामा

Skin Care: थंडीत चेहरा काळा पडतोय? घरातला फक्त एक पदार्थ वापरा, चेहरा हिऱ्यासारखा चमकेल, गाल होतील मऊ-मऊ

Maharashtra Live News Update: नागपूर-रत्नागिरी महामार्गासाठी अंकली ते चोकाक भूसंपादनाचा मार्ग मोकळा

New Year Special: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी घराच्या घरी बनवा टेस्टी प्लम केक

SCROLL FOR NEXT