Kuldeep Yadav On KL Rahul saam tv
Sports

Kuldeep Yadav: केएल राहुलच्या 4 शब्दांचा इम्पॅक्ट अन् कुलदीप यादवनं टाकली मॅचविनिंग स्पेल! सामन्यानंतर स्वत: केला खुलासा

Kuldeep Yadav On KL Rahul: कुलदीप यादवने या सामन्यानंतर मोठा खुलासा केला आहे.

Ankush Dhavre

Kuldeep Yadav Statement On KL Rahul:

आशिया चषकात आतापर्यंत कुलदीप यादवच्या गोलंदाजीचा जलवा पाहायला मिळाला आहे. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात कुलदीप यादवने ५ गडी बाद केले होते. तर श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात त्याने ४ विकेट्स घेत भारतीय संघाच्या विजयात मोलाची भुमिका बजावली आहे. दरम्यान सामन्यानंतर त्याने या दमदार कामगिरीचं श्रेय केएल राहुलला दिलं आहे.

गेले काही महिने भारतीय संघातून बाहेर असलेल्या कुलदीप यादवने भारतीय संघासाठी दमदार कमबॅक केलं आहे. गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याने मॅचविनिंग गोलंदाजी केली आहे. श्रीलंकेविरूद्ध घेतलेल्या ४ विकेट्सपैकी एका विकेटचं श्रेय त्याने केएल राहुलला दिले आहे.

हा विकेट होता श्रीलंकेचा फलंदाज सदीरा समरविक्रमाचा. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर समरविक्रमाने पुढे येऊन शॉट खेळण्याचा प्रयत्ने केला.

मात्र त्याचा हा प्रयत्न फसला. याष्टिरक्षण करत असलेल्या केएल राहुलने त्याला त्रिफळाचित करत माघारी धाडले.

केएल राहुलला दिलं श्रेय..

श्रींलकेविरूद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कुलदीप यादव केएल राहुलचं कौतुक करताना दिसून येत आहे. त्याने म्हटले की, केएल राहुलने मला चौथ्या किंवा पाचव्या स्टम्पवर चेंडू टाकण्याचा सल्ला दिला. त्यामुळे माझे चेंडू आणखी जास्त फिरतील. मी सदीराच्या विकेटचं श्रेय केएल राहुलला देईन.' (Latest sports updates)

गोलंदाजीसह फलंदाजीवर देतोय भर..

कुलदीप यादवने या सामन्यात ४ गडी बाद करत वनडे कारकिर्दीत १५० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. तसेच गोलंदाजीसह फलंदाजीवरही भर देत असल्याचं त्याने सांगितलं.

याबाबत बोलताना तो म्हणाला की, 'आता वर्ल्डकप येतोय, जेव्हा संघाला धावांची गरज असेल त्यावेळी मला फलंदाजीतही योगदान देऊन विजय मिळवून द्यायचा आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची उचलबांगडी, निकेत कौशिक यांची नियुक्ती

Mathri Recipe : चिप्स, कुरकुरे सोडा; मुलांसाठी घरीच कुरकुरीत 'मठरी' बनवा

बाहुबली फेम प्रसिद्ध कलाकाराचं निधन; मुलगा ऑस्कर विजेता, सिनेसृष्टी शोकसागरात बुडाली | Bahubali

Maharashtra Live News Update : भंडारा जिल्हा प्रशासनाकडून शाळांना आज आणि उद्या सुट्टी; हवामान विभागाकडून रेड अलर्ट

Beed News: बीडमध्ये रस्ता पाहणीदरम्यान ट्रक खड्ड्यात कोसळला|VIDEO

SCROLL FOR NEXT