Bharat Taxi: Ola-Uber ला नव्या वर्षात सरकार देणार टक्कर, भारत टॅक्सी १ जानेवारीपासून लाँच, किती असेल तिकिटाची किंमत, फायदा काय ?

Bharat Taxi Launch From 1st January 2025: केंद्र सरकारने भारत टॅक्सीची घोषणा केली. ही टॅक्सी सेवा आता १ जानेवारीपासून सुरु होणार आहे. यामुळे प्रवासी आणि चालकांनाही फायदा होणार आहे.
Bharat Taxi
Bharat TaxiSaam tv
Published On
Summary

केंद्र सरकारने केली भारत टॅक्सीची घोषणा

१ जानेवारीपासीन होणार सुरु

चालक आणि प्रवाशांना होणार फायदा

भारत सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारत सरकार देशातील पहिला ड्रायव्हर संचलित टॅक्सी सेवा सुरु करणार आहे. ही सेवा ओला-उबर अशा टॅक्सी सर्व्हिसला आवाहन देईल. ही सेवा १ जानेवारीपासून सुरु होईल.यामुळे भारतात एक नवीन सेवा सुरु केली जाते.

सहकारी तत्वावर आधारित ही भारत टॅक्सीची सेवा असते. भारत टॅक्सीद्वारे टॅक्सी चालकांचे उत्पन्न दुप्पट करणे, हे सरकारचे उद्दिष्ट आहे.

Bharat Taxi
Bike Taxi: रॅपिडोसह ओलाविरोधात आणखी एक गुन्हा, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

केंद्र सरकारची घोषणा (Bharat Taxi Launch by Central Government)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, भारत टॅक्सी मॉडेल खासगी सेवा पुरवठारांपेक्षा वेगळं असेल. सध्या ज्या कंपन्या या टॅक्सीचं काम करतात त्याचा नफा मालकांकडे जातो. मात्र, आता या नवीन भारत टॅक्सी सेवांद्वारे सर्व रक्कम ही चालकांच्या खिशात जाईल.

चालकांना मिळणार भाड्याची संपूर्ण रक्कम

खासगी टॅक्सी कंपन्या या चालकांकडून २०-३० टक्के कमिशन घेतात. परंतु आता चालकांकडून कमिशन घेणार नाही. प्रवासाची संपूर्ण रक्कम ही टॅक्सी चालकांना मिळणार आहे. यामुळे प्रवासी आणि टॅक्सी चालकांना दोघांनाही फायदा होणार आहे.

प्रवाशांनाही होणार फायदा

भारत टॅक्सी सेवेचा फायदा हा प्रवाशांनादेखील होणार आहे. यामुळे गर्दीच्या वेळी कंपन्यांकडून भाडेवाढ केली जाते. परंतु या भारत टॅक्सीमध्ये ही पद्धत नसेल. याचसोबत वाहन चालकांना विमा संरक्षण आणि जाहिरातींच्या माध्यमातून मिळणारी रक्कम थेट मिळेल. यामध्ये कोणतेच कमिशन नसेल.

सध्या भारत टॅक्सी सेवा ही दिल्ली आणि गुजरातमध्ये सुरु झाली आहे. त्यानंतर संपूर्ण देशात ही सेवा सुरु केली जाईल. पुढच्या दोन वर्षात ह भारतातील सर्वात मोठी टॅक्सी कंपनी बनेल, असा विश्वास आहे.

Bharat Taxi
Pune-Nagpur Vande Bharat Train: पुणे - नागपूर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये मोठा बदल, रेल्वेने नेमका काय घेतला निर्णय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com