mohammed shami saam tv news
क्रीडा

Mohammed Shami News: 'आता तरी सुधारा रे...' टीका करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंवर शमी भडकला

Mohammed Shami On Pakistan Cricketers: मोहम्मद शमीने पाकिस्तानी खेळाडूंवर हल्लाबोल केला आहे. त्याने पाकिस्तानी खेळाडूंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Ankush Dhavre

Mohammed Shami Statement:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतीय संघाला वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकता आली नसली तरी खेळाडूंनी दमदार खेळ करत करत असंख्य क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली आहे. १० सामने जिंकल्यानंतर भारतीय संघ अंतिम सामन्यात पराभूत झाला. या पराभवानंतर पाकिस्तानी खेळाडूंनी भारतीय संघातील खेळाडूंवर टीका करत आरोप केले होते. आता मोहम्मद शमीने टीका करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाला शमी?

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने पाकिस्तानी क्रिकेटपटूंवर हल्लाबोल करत म्हणाला की,'मी कोणाला दोष देणार नाही. पण मी गेल्या काही दिवसांपासून ऐकतोय. ते सतत आमच्यावर कमेंट करताय.

त्यांना असं वाटतंय की, ते बेस्ट आहे. बेस्ट तोच असतो जो योग्यवेळी चांगली कामगिरी करतो, जो मेहनत घेतो, जो प्रदर्शन करतो,जो संघासाठी उभा राहतो, ज्यादिवशी तुम्ही दुसऱ्यांदा विजयाचा आनंद घ्यायला शिकाल ना तेव्हा चांगले खेळाडू बनाल. उगाच वाद निर्माण करताय आम्हाला वेगळा बॉल दिला जातोय, आम्हाला वेगळ्या रंगाचा बॉल दिला जातोय.'

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू हसन रजाने मोहम्मद शमीवर टीका करत म्हटले होते की, भारतीय गोलंदाजांना वेगळा बॉल दिला जातोय,यावर शमीने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्याने म्हटले की, 'मला कोणाचाच हेवा वाटत नाही, तुम्हाला का हेवा वाटतो. मी तर खेळतही नव्हतो. जेव्हा खेळलो तेव्हा ५ विकेट्स घेतल्या, पुढच्या सामन्यात ४ आणि त्यानंतर परत ५ विकेट्स घेतल्या. हे पाकिस्तानच्या काही खेळाडूंनी पहावत नाहीये.यात मी तरी काय करणार. मी तर प्रार्थना करतो, की १० खेळाडूंनी यावं आणि अशी कामगिरी करावी आणि नाही करता आली तर अजिबात बडबड करु नका. आता तरी सुधारा..वसीम भाईंनी समजवलं आहे. त्यामुळे आमच्यावर नाही तर खेळावर लक्ष केंद्रीत करा.' (Latest sports updates)

भारतीय गोलंदाज या स्पर्धेत स्विंग आणि रिव्हर्स स्विंग करुन फलंदाजांची बत्ती गुल करताना दिसून आले होते. भारतीय संघातील गोलंदाजांची कामगिरी पाहुन हसन रजा म्हणाला होता की,'भारतीय गोलंदाजांना वेगळा चेंडू दिला जात आहे. ज्यावर एक्स्ट्रा लेयर आणि एक्स्ट्रा कोटींग करण्यात आली आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: इस्लामपूरमध्ये जयंत पाटील आघाडीवर

Maharashtra Election Result : राज्यात कोणाला झटका, कोणाला धक्का? बाळासाहेब थोरात, सावंत ते सत्तार पिछाडीवर

Gulabrao Patil News : लाडक्या बहीणींचा आशीर्वाद मत पेटीतून आला आहे, गुलाबराव पाटील यांची मोठी प्रतिक्रिया

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

SCROLL FOR NEXT