राज्यस्तरीय स्पर्धेदरम्यान Nikhil Suresh या किकबॉक्सरचा मृत्यू ; व्हिडिओ व्हायरल
राज्यस्तरीय स्पर्धेदरम्यान Nikhil Suresh या किकबॉक्सरचा मृत्यू ; व्हिडिओ व्हायरल Saam TV
क्रीडा | IPL

Nikhil Suresh : किकबॉक्सिंगच्या राज्यस्तरीय स्पर्धेदरम्यान बॉक्सरचा मृत्यू; पाहा नेमकं काय घडलं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बंगळुरू, कर्नाटक: खेळांमध्ये अनेकवेळा अशा घटना घडतात, ज्या खूप वेदनादायक असतात. अशीच एक वेदनादायक घटना बंगळुरू (Benglore) येथील राज्यस्तरीय किक बॉक्सिंग (Boxing) स्पर्धेत घडली आहे. किक बॉक्सिंग स्पर्धेदरम्यान एका बॉक्सरचा मृत्यू झाला आहे. यानंतर कर्नाटक पोलिसांनी (Karnataka Police)आयोजकांवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला. निखिल सुरेश (२३) असे या बॉक्सरचे नाव आहे. एका बॉक्सिंग मॅचदरम्यान प्रतिस्पर्धी बॉक्सरने निखिलच्या चेहऱ्यावर जोरदार पंच मारला, यात जखमी झालेला निखिल सुरेश हा दोन दिवस कोमात राहिला, त्यानंतर त्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. (Fighter Nikhil Suresh passed away a fight)

हे देखील पाहा -

या दोन्ही बॉक्सर्सच्या लढतीचा व्हिडिओ सोशल (Viral Video) मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोन्ही बॉक्सर एकमेकांना पंच मारताना दिसत आहेत. मात्र यादरम्यान प्रतिस्पर्धी बॉक्सरने निखीलच्या चेहऱ्यावर जोरदार पंच मारला, यात निखिल एका पंचानंतर खाली पडला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी असलेल्या प्रतिस्पर्धी खेळाडूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कर्नाटकच्या के-१ असोसिएशनने ही स्पर्धा आयोजित केली होती. आपत्कालीन उपचार सुविधांशिवाय ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. निखिलला दुखापत झाली तेव्हा रुग्णवाहिका आणि स्ट्रेचरही नव्हते.

मिळालेल्या माहितीनुसार, ही बाब रविवार 10 जुलैची आहे. जेव्हा बंगळुरूच्या जनभारती पोलिस स्टेशन हद्दीतील परिसरात किक बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एका सामन्यात जेव्हा नवीन आणि निखिल नावाचे खेळाडू एकमेकांशी भांडत होते, तेव्हा निखिल नवीनच्या एका ठोसेने जमिनीवर पडला. अनेक प्रयत्न करूनही जेव्हा निखिलला जाग आली नाही तेव्हा त्याला रुग्णालयात नेले असता दोन दिवस कोमात राहिल्यानंतर त्याचा मृत्यू झाला.

निखिलच्या मृत्यूनंतर त्याचे प्रशिक्षक (कोच) नागराज यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिले की, ज्या बातमीची आम्हाला भीती होती ती मी सांगणार आहे. माझे बाळ निखिल आज संपले. त्याने हातमोजे लटकवले आहेत. चांगल्या वैद्यकीय उपचारांदरम्यानच्या प्रत्येक तासाच्या संघर्षानंतर त्याचा सुंदर आत्मा आम्हाला सोडून गेला. तो आमच्या आठवणीत जिवंत राहील. माझी ही भावना मी शब्दात वर्णन करू शकत नाही. आज मी माझा एक मुलगा गमावला आहे. हे नुकसान सहन करण्याचे बळ देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. मी माझ्या मनापासून शोक व्यक्त करतो. निखिलचे वडील कराटे मास्टर आहेत. निखिलच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. निखिलने म्हैसूरमधील जयनगर विक्रम येथे किक बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेतले.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जातेय; आम आदमी पक्षाचा गंभीर आरोप

Amit Shah Fake Video: अमित शहांच्या भाषणाचा बनावट व्हिडीओ व्हायरल; भाजप नेते आक्रमक, पोलिसांत गुन्हा दाखल

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, 'या' राशींच्या लोकांसाठी सोमवार ठरणार त्रासदायक; तुमची रास यात नाही ना?

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

SCROLL FOR NEXT