gautam gambhir yandex
Sports

Chhaava Movie: दुबईत छावा चित्रपट पाहिल्यानंतर Gautam Gambhir होतोय ट्रोल; पोस्ट शेअर करताच...

Gautam Gambhir On Chhaava Movie: भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर छावा चित्रपट पाहिल्यानंतर ट्रोल होतोय, नेमकं कारण काय? जाणून घ्या.

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफऱी २०२५ स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. जगभरातील ८ मजबूत संघ या स्पर्धेत जेतेपदाची ट्रॉफी उंचावण्यासाठी जोर लावताना दिसून येणार आहेत. स्पर्धेतील पहिला सामना यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. तर भारतीय संघाचा पहिला सामना २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध होणार आहे.

या सामन्यासाठी भारतीय संघ दुबईत दाखल झाला आहे. भारतीय संघ नेट्समध्ये कसून सराव करताना दिसून येत आहेत. तर दुसरीकडे भारताचा हेड कोच गौतम गंभीर विक्की कौशलचा बहुचर्चित छावा चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. हा चित्रपट पाहून आल्यानंतर त्याने एक पोस्ट शेअर केली. ही पोस्ट व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

गौतम गंभीर ट्रोल होण्याचं नेमकं कारण काय?

सध्या छावा चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर हवा आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारीत असलेला हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी पाहायला मिळतेय. सरावातून वेळ मिळाल्यानंतर, गौतम गंभीरनेही हा चित्रपट पाहण्याचा आनंद घेतला.

गंभीरने चित्रपट पाहिल्यानंतर,' Chatrapati sambhaji maharaj devotion to motherland!..' अशी पोस्ट शेअर केली. ही पोस्ट व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला आहे. एका युझरने लिहिले, ' कोचिंग कर ना भाऊ..कशाला चित्रपट बघतोय..', तर आणखी एका युझरने पोस्ट शेअर करत लिहिले की, ' चॅम्पियन्स ट्रॉफी हरवू नका..'

छावा हा सुपरहिट चित्रपट आहे. प्रत्येकाला वाटतं की, हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन पाहावं. मात्र काही फॅन्सला वाटतंय की, गंभीरने आपलं संपूर्ण लक्ष चॅम्पियन्स ट्रॉफीवर केंद्रीत करावं. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ही मोठी स्पर्धा आहे.

त्यामुळे गंभीरचं संपूर्ण लक्ष तिकडे असायला हवं. असं झालं नाहीतर त्याचा परिणाम भारतीय संघाच्या कामगिरीवर दिसून येऊ शकतो. तर काही फॅन्स त्याचं कौतुक करताना दिसून आले आहेत. चित्रपट पाहताच गंभीरने पोस्ट शेअर केली.

चॅम्पियन्स बनण्यासाठी प्लॅनिंग

दुबईत दाखल होताच , भारतीय संघाने सरावाला सुरुवात केली आहे. भारतीय संघाला सराव सामने खेळण्याची संधी मिळालेली नाही. गौतम गंभीर कर्णधार रोहित शर्मासोबत प्लानिंग करताना दिसून आला. यासह तो विराटला फलंदाजीचे आणि केएल राहुलला यष्टीरक्षणाचे धडे देतानाही दिसून आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT